मध्य प्रदेशात भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर - BJP Leading in Madhya Pradesh Elections | Politics Marathi News - Sarkarnama

मध्य प्रदेशात भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष १८ जागांवर तर काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर आहे. या ठिकाणी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचे मतदान झाले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष १८ जागांवर तर काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर आहे. या ठिकाणी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचे मतदान झाले होते. मध्य प्रदेशातील २३० जागांच्या विधानसभेतील २५ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.

काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. एकूण २८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. उर्वरित तीन जागांवरील विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागली. या पोटनिवडणुकीसाठी ७०.२७ टक्के मतदान झाले होते. मध्य प्रदेशच्या १२ मंत्र्यांसह ३५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 

बिहारमध्ये एनडीएची आघाडी
बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल दुसऱ्या तासात बदलले असून आता भाजप व जनता दल (यु)च्या एनडीएने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रीय जनता दल - काँग्रेसची महाविकास आघाडी ९७ जागांवर आघाडीवर आहे.  बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. आज सकाळी तेथे मतमोजणी सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि लालूप्रसाद यांचे पूत्र तेजस्वी यादव यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चुरस आहे. आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन आघाडीवर होते. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या गोटात उत्साह पसरला होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात कल बदलला.
Edited By - Amit Golwlakar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख