बिहार निवडणूक : भाजप नेत्यांमध्ये कोरोनाची साथ - Bjp leaders involved in Bihar Campaign infected by Corona Virus | Politics Marathi News - Sarkarnama

बिहार निवडणूक : भाजप नेत्यांमध्ये कोरोनाची साथ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

बिहारची रणधुमाळी भरात आली असताना भाजपच्या प्रमुख बिहारी नेत्यांना प्रचारातून बाजूला व्हावे लागणार असल्याने पंतप्रधानांपासून जे पी नड्डा, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव आदी दिल्लीकर नेत्यांवरच भाजपला प्रचाराची भिस्त ठेवावी लागणार आहे. यादव व भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही गेले अनेक दिवस काही कोरोनाग्रस्त नेत्यांच्या सतत संपर्कात राहिलेले असून त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्वाकडून प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान अवघा आठवड्यावर आलेले असताना भाजपचे एकामागोमाग एक नेते कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडले आहेत. शाहनवाज हुसेन व राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आदी किमान डझनभर भाजप नेते कोरोना संक्रमणाने विलीगीकरणात गेले आहेत. हुसेन यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करावे लागले आहे.

बिहारची रणधुमाळी भरात आली असताना भाजपच्या प्रमुख बिहारी नेत्यांना प्रचारातून बाजूला व्हावे लागणार असल्याने पंतप्रधानांपासून जे पी नड्डा, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव आदी दिल्लीकर नेत्यांवरच भाजपला प्रचाराची भिस्त ठेवावी लागणार आहे. यादव व भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही गेले अनेक दिवस काही कोरोनाग्रस्त नेत्यांच्या सतत संपर्कात राहिलेले असून त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्वाकडून प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

रूडी व शहानवाज यांना भाजपने बिहारच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर ती फक्त पहिल्या टप्प्यासाठीची यादी असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. आता दोघेही कोरोना संक्रमित झाल्याने दुसऱ्या टप्प्याचा परचारही ते करू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. शाहनवाज यांनी स्वतः ट्विट करून आपण कोवीडग्रस्त झाल्याचे पण काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. 

इतरांनी तसे अधिकृतपणे सांगितलेले नाही. मात्र मोदी, रूडी व पांडे गेल्या काही दिवसांपासून तापाने त्रस्त आहेत. बिहारमध्ये प्रचारसबांमध्ये कोरोना आरोग्य नियम पायदळी तुडवले जात असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे. राज्यात आतापावेतो २ लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त असून १०१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ लाख ९४ हजार ८८९ लोक बरे झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख