शिवराजसिंह चौहानांचे सरकार पाडण्याचा भाजपचा हा नेता कट रचत असल्याचा आरोप !

गेल्या तीन महिन्यापूर्वी ज्योतिरादित्य यांच्या मदतीने सत्तेवर आलेले चौहान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विजयवर्गीय करीत असल्याचा आरोप आता शेखावत यांनी केला आहे.
    शिवराजसिंह चौहानांचे सरकार पाडण्याचा भाजपचा हा नेता कट रचत असल्याचा आरोप !

भोपाळ : तीन महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या मदतीने सत्तेवर आलेले शिवराजसिंह चौहान यांचे सरकार पुन्हा कोसळविण्याच्या हालचाली भाजपचेच ज्येष्ठ ने कैलास विजयवर्गीय करीत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचेच नेते भनवरसिंह शेखावत यांनी केला आहे. 

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशमध्ये भाजपला कॉंग्रेसने धोबीपछाड देत सत्ता खेचून आणली होती. कोणालाच बहुमत मिळाले नव्हते तरी कॉंग्रेस काठावर पास झाली होती. कॉंग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी चौहान यांचे सरकार कसे सत्तेवर येणार नाही याची काळजी विजयवर्गीय घेत होते असे शेखावत यांनी म्हटले आहे. भनवरसिंह यांनी इंडियन एक्‍स्प्रेसशी बोलताना हा आरोप केला आहे. 

मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या पराभवानंतर कॉंग्रेस सत्तेवर आली आणि मुख्यमंत्रीपदी ज्येष्ठ नेते कमलनाथ आले. पण, कॉंग्रेसमध्येही टोकाचे मतभेद होते. राहुल गांधींच्या टीममधील एक नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना वाटत होते की, आपणास मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. राहुल गांधी यांनी मात्र त्यांना राष्ट्रीय राजकारणातच सक्रिय होण्याचा सल्ला दिला होता. 

शिंदे हे कमालीचे नाराज होते. पुढे त्यांचे आणि राहुल गांधींचे काही पटले नाही. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल यांनी शिंदे यांना खडेबोल सुनावले होते. ऐनप्रचारात शिंदे हे परदेशात जाऊन बसले होते.

जेव्हा निकाल लागले तेव्हा ते स्वत:ही निवडून येऊ शकले नाहीत. पराभव जिव्हारी लागलेले शिंदे पुढे थेट भाजपत गेले आणि त्यांनी आपल्या समर्थकांना कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेण्याचा सल्ला दिला आणि कमलनाथ सरकार कोसळले. 

गेल्या तीन महिन्यापूर्वी ज्योतिरादित्य यांच्या मदतीने सत्तेवर आलेले चौहान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विजयवर्गीय करीत असल्याचा आरोप आता शेखावत यांनी केला आहे. म्हणजे मध्यप्रदेशात कॉंग्रेसप्रमाणेच भाजपमध्ये शहकाटशहाचे राजकारण असल्याचे दिसून येत आहे. 

शेखावत यांनी विजयवर्गीय यांच्यावर कडाडून हल्ला चढविला आहे. त्यांनी म्हटले आहे, की राज्यात विधानसभेच्या 24 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मालवा विभागात विजयवर्गीय यांनी दहा ते बारा बंडखोर उभे केले आहे. जेणेकरून भाजपच्या उमेदवारांचा पराभव होईल. 2018 मध्ये त्यांनी असेच केले होते. बंडखोरांना त्यांनी रसद दिली होती. 

विजयवर्गीय यांना अतिमहत्त्वाकांक्षा आहे आणि त्यांना मध्यप्रदेशचे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते चौहान यांच्याविरोधात कटकारस्थान करीत असतात. त्यांची चौकशी व्हायला हवी अशी मी प्रदेश भाजपकडे मागणी केली आहे. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी थेट पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटून विजयवर्गीय नेमकं काय करतात हे सांगणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com