sachin pilot
sachin pilot

`बाद में देखेंगे` म्हणत भाजपने सोडला सचिन पायलट यांचा नाद?

पायलट यांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची आहे. मात्र भाजप नेतृत्वाने पायलट त्यांच्याशी चर्चा केल्यावर केवळ त्यांच्या एकट्याच्या जोरावर राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. ते परवा दिल्लीत आले तेव्हा त्यांच्या मागे तीस नव्हे तर केवळ तीन ते सहा आमदार असल्याचे चित्र होते.

नवी दिल्ली :  बंडखोर सचिन पायलट यांच्यामागे राजस्थानातील गेहलोत सरकार पाडण्यासाठी आवश्यक तेवढे आमदार जमा न होणे आणि वसुंधराराजे गटाने या हालचालींबद्दल व्यक्त केलेली अप्रत्यक्ष नाराजी यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला राजस्थानातील 'ऑपरेशन कमळ'चा विचार सोडून द्यावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी “ राजस्थान के बाद तो सीधा महाराष्ट्र” ही दिल्लीतील भाजप नेत्यांची चर्चाही तूर्तास थंडावल्याचे दिसते.

राजस्थानात बहुमतासाठी लागणाऱ्या आमदारांची संख्या  एमपी व कर्नाटकापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे पंचवीस ते तीस इतकी होती. पायलट यांना फोडण्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वान  जवळपास यशही मिळवले होते. पायलट यांनी काल मध्यरात्री गृहमंत्री अमित शहा यांच्याशी खलबते केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला भाजपमधून दुजोरा देण्याची हिंमत कोणात नसली तरी या भेटीच्या वेळी पायलट यांच्या पिढीतील ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित होते असे समजते.

पायलट यांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची आहे. मात्र भाजप नेतृत्वाने पायलट त्यांच्याशी चर्चा केल्यावर केवळ त्यांच्या एकट्याच्या जोरावर राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. ते परवा दिल्लीत आले तेव्हा त्यांच्या मागे तीस नव्हे तर केवळ तीन ते सहा आमदार असल्याचे चित्र होोते. होते तेेही आमदार जयपूरला स्वपक्षात परत घेण्याच्या मानसिकतेत होते, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पायलट यांना भाजप नेतृत्वाकडून तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेची कल्पना सुचवण्यात आली. प्रगतीशील मंच वा प्काँग्रेस या नावाने त्यांनी ही आघाडी काढावी. सरकार बनवावे व भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा द्याावा असा पर्याय चर्चेत समोर आला. त्यानंतर रातोरात राजस्थानच्या महाराणी वसुंधराराजे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्या गटाकडून अशा प्रयत्नांना मुळातच विरोध सुरू झाला. वसुंधराराजे हे भाजपमधील स्वतंत्र संस्थान आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम आधी राज्यांप्रमाणे त्या केंंद्रीय पुरस्कृत नेतृत्व नाहीत आणि त्यांच्या मागे 85 पैकी बहुतांश भाजप आमदार ठाम असल्याचे चित्र आहे. वसुंधरा यांना आपल्या वर्चस्वाखाली घेणे भाजप नेतृत्वाला अद्याप शक्य झालेले नाही.

राजस्थानात तिसऱ्या आघाडीचे प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. 2018 च्या निवडणुकीपूर्वी बंडखोर हनुमान बेनीवाल यांनी भारत विकास पक्ष नावाने आघाडी काढली होती. नंतर भाजपने ती बनवणारे किरोडी लाल मीना यांना राज्यसभा खासदारकी दिली. मात्र त्या राज्यात काँग्रेस व भाजप शिवाय तिसऱ्या आघाड्यांचा खेळ यशस्वी होत नाही हे स्पष्ट आहे. वसुंधरा राजे यांची आणखी नाराजी ओढवून घेण्याची लक्षणे दिसू लागल्यावर आणि पायलट यांचा जोर कमी पडत असल्याचे स्पष्ट झाल्यावर शहा यांनी, अच्छा, तो कल देखेंगे, असे म्हणून रात्रीच्या अंधारातल्या कथित बैठकीचे `विसर्जन` केल्याची माहिती मिळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com