प्रिय गेहलोत, डोळे बंद केले म्हणून सूर्य गायब होत नाही...

राजस्थानमधील राजकीय वादळ अखेर शमले असून, कोणत्याही चर्चेला सचिन पायलट बधत नसल्याचे पाहून अखेर पक्षाने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. यावर आता भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
bjp blames congress and chief minister ashok gehlot for rajasthan political crisis
bjp blames congress and chief minister ashok gehlot for rajasthan political crisis

भोपाळ : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने  उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्याचे चित्र आहे. राजस्थानमधील राजकीय संकटावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसच्या दुबळेपणामुळे हे संकट ओढवले, अशी टीका भाजपने केली आहे.  

राज्यातील राजकीय संकटाला भाजप कारणीभूत आहे, असा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे. याचा समाचार घेताना भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर म्हणाले की, प्रिय अशोक गेहलोत डोळे बंद केले म्हणून सूर्य गायब होत नाही. तुमच्या घराच्या रचनेत कमकुवतपणा आहे. असे असतानाही तुम्ही भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला दोष देत आहात. काँग्रेसचा दुबेळपणा यासाठी कारणीभूत ठरला आहे. 

सचिन पायलट यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. पायलट यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता. पायलट दोन दिवस दिल्लीत जाऊन बसले होते. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते परंतु, त्याबाबत अधिकृत दुजोरा कोणी दिलेला नव्हता. गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करून पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी आतापर्यंत तीनवेळा तसे प्रयत्न केले होते परंतु, त्यांना यश आलेले नव्हते.  

राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज जयपूर येथील हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षविरोधी कारवाया करणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी बैठकीत आमदारांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पायलट यांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. पायलट यांचे बंड मोडून काढण्याचे शेवटी पक्षाने ठरविले आहे. पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे सुरजेवाला यांनी जाहीर केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com