Bihar Elections 2020 : एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरविणारा कल - Bihar Elections Update Exit Poll Results proving Wrong | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

Bihar Elections 2020 : एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरविणारा कल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या जो कल दिसतो आहे, त्यानुसार विविध संस्था व वाहिन्यांनी नोंदवलेले कल खोटे ठरु पहात आहेत. आतापर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यानुसार एनडीने बहुमताला आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या जो कल दिसतो आहे, त्यानुसार विविध संस्था व वाहिन्यांनी नोंदवलेले कल खोटे ठरु पहात आहेत. आतापर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यानुसार एनडीने बहुमताला आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. एक्झिट पोलनुसार महागठबंधन कडे मतदारांचा कल राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता चित्र उलटे दिसते आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. आज सकाळी तेथे मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय जनता दल ६५ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला ७२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर जनता दल (यु) ला ४६ जागांवर आघाडी आहे. लोकजनशक्ती पक्षाला ०३ जागी आघाडी असून ३६ जागी अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि लालूप्रसाद यांचे पूत्र तेजस्वी यादव यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चुरस आहे. आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख