बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : अडवानींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता - Babri Case All Accused Discharged from Case | Politics Marathi News - Sarkarnama

बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : अडवानींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

वृत्तसंस्था
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या प्रकरणात लखनौ येथील विशेष न्यायालयाने लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कारसेवकांनी बाबरी मस्जिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली होती. मस्जिदीची निर्मिती ही श्रीरामाचे मंदिर पाडून झाली होती, असे कारसेवकांचे म्हणणे होते.  बाबरी मस्जिद पाडल्याच्या प्रकरणाचा निकाल आता २८ वर्षांनंतर आला आहे.

लखनऊ : अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या प्रकरणात लखनौ येथील विशेष न्यायालयाने लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कारसेवकांनी बाबरी मस्जिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली होती. मस्जिदीची निर्मिती ही श्रीरामाचे मंदिर पाडून झाली होती, असे कारसेवकांचे म्हणणे होते.  बाबरी मस्जिद पाडल्याच्या प्रकरणाचा निकाल आता २८ वर्षांनंतर आला आहे.

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादूर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर  यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. 

लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंग, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली. साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यासह अन्य सर्व आरोपी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. 

बाबरी मस्जिदीच्या विध्वंसप्रकरणी लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून आज निकाल सुनावण्यात आला. कारसेवकांनी बाबरी मस्जिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली होती.  मस्जिदीची निर्मिती ही श्रीरामाचे मंदिर पाडून झाली होती, असे कारसेवकांचे म्हणणे होते.  बाबरी मस्जिद पाडल्याच्या प्रकरणाचा निकाल आता २८ वर्षांनंतर आला आहे.

कोर्टाने प्रकरणातील सर्व ३२ मुख्य आरोपींना आजच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते समाविष्ट आहेत. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह, विनय कटियार यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांनी हा निकाल सुनावला.

याआधी न्यायाधीशांनी २२ ऑगस्ट रोजी खटल्याचा स्थिती अहवाल पाहून प्रकरणाची सुनावणी पुर्ण करण्याची शेवटची तारिख एक महिन्यांनी वाढवून ती ३० सप्टेंबर केली होती. न्यायालयाने खटला पुर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला होता. या प्रकरणी २ सप्टेंबर रोजी निकाल लिहण्यास सुरवात होणार होती. सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील मृदल राकेश, आयबी सिंह आणि महिपाल अहलूवालिया यांनी आरोपींच्यावतीने शाब्दिक युक्तिवाद केला होता. बचाव पक्ष आपला लिखित जबाब सादर करत नसल्याच्या कारणावरुन याआधी कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली होती. विशेष न्यायाधिशांनी बचाव पक्षाच्या वकिलांना म्हटलं होतं की, जर त्यांना शाब्दिक युक्तिवाद करायचा असेल तर ते १ सप्टेंबरपर्यंत करु शकतात. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही.

यानंतर सीबीआयचे वकील ललित सिंह, आर. के. यादव आणि पी. चक्रवर्ती यांनी देखील शाब्दिक युक्तीवाद केला होता. सीबीआयच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या विरोधात ३५१ साक्षी आणि जवळपास ६०० कागदपत्रे सादर केली गेली. न्यायलयाने सीबीआयच्या साक्षींना आणि कागदपत्रांना लक्षात घेऊन हा निकाल दिला. सीबीआयने याआधीच ४०० पानांचा लिखित युक्तिवाद सादर केला होता. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख