दाऊद भाई सेफ है; अनिस इब्राहिमचा खुलासा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचाकोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दाऊदच्या भावाने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
anees ibrahim denies rumours of dawood died of corona virus
anees ibrahim denies rumours of dawood died of corona virus

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर कराचीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. 

अनिस हा दाऊदच्या टोळीच्या आर्थिक व्यवहार आणि इतर कामकाज पाहतो. अनिसने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, भाई (दाऊद) हे सुखरुप आहेत आणि शकीलही सुखरुप आहे. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. सर्व जण घरी सुरक्षित आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आमचे कामकाज सुरळीत सुरू आहे. 

दाऊद आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त काही माध्यमांनी गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिले होते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून, दोघांच्या उपचारांवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची देखरेख असल्याचेही म्हटले होते. दहा दिवसांपूर्वी लष्करे तैयबाच्या काही दहशतवाद्यांना दाऊद भेटला असून होता. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आला होता, असेही वृत्तात म्हटले होते. 

सोशल मीडियावर जोरदार रंगली चर्चा 

दाऊदच्या मृत्यू चर्चेच्या पार्श्वभूमीवर  सोशल मीडियावर मीम्स सुरू झाले. नेटकऱ्यांनी दाऊदच्या मृत्यूचा ट्रेंडच सुरू केला. अनेक जणांनी दाऊदची तुलना डब्लूडब्लूईमधील सुपरस्टार अंडरटेकर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्याशी केली. मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणारा पृथ्वीवर केवळ एकमेव व्यक्ती असून, तो अंडरटेकर आहे. आता यात दाऊदची भर पडली आहे, असा विनोद करण्यात आला. याचबरोबर क्रिकेट सोडून पुन्हा कमबॅक करण्याच्या आफ्रिदीच्या सवयीची तुलनाही दाऊदशी करण्यात आली आहे. 

‘चकमक फेम’ सचिन वाझे सेवेत 

मुंबई: घाटकोपर स्फोटांमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणी निलंबित झालेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. वाझे यांच्यासह १८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले आहे. त्यांच्यात ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झालेल्या चार पोलिसांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com