अमित शहा म्हणतात, "" फक्त झाडेच आपल्याला वाचवू शकतात !'' - Amit Shah says, "Now only trees can save you!" | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा म्हणतात, "" फक्त झाडेच आपल्याला वाचवू शकतात !''

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 जुलै 2020

जागतिक तापमान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण होणे आवश्‍यक आहे.

नवी दिल्ली : ऐरवी अमितभाईंचे भाषण म्हटले की ते राजकीय धुरळा उडवून जातात. विरोधकांना चारीमुंड्याचित करणारे शहा यांचे भाषण म्हणजे भाजपसह विरोधकांनाही काही ना काही संदेश देऊन दिलेला असतो..

मात्र त्यांचे आजचे भाषण पूर्णपर्ण वेगळे होते. त्यांनी निसर्ग आणि पर्यावरणावर केलेले भाषण आणि जागृती करण्याचे केलेले आवाहनही बरंच काही सांगून गेले. 

निमित्त होते केंद्रीय कोळसा मंत्री यांच्या बंगल्याच्या आवारातील वृक्षारोपण कार्यक्रमाचे. शहा यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. 

या छोटेखाणी कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, "" दहा राज्यांतील 38 जिल्ह्यांमध्ये सहा हजार एकरावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्यापैकी सहाशे एकर जागांवर तसे वृक्षारोपण सुरू आहे. सहा लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून पाच लाख झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. जागतिक तापमान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृतीही व्हायला हवी. आपल्याला फक्त झाडेच वाचवू शक्तात असे पुराणातच सांगितले आहे.'' 

काश्‍मीरमधील बाजारपेठा ईदनिमित्त खुल्या 
श्रीनगर बकरी ईदनिमित्त जम्मू-काश्‍मीरमधील बाजारपेठा येत्या २८ ते ३० या तारखांना खुल्या राहणार आहे. या काळात लॉकडाउन असले तरी ईदसाठी आवश्‍यक वस्तू आणि कुर्बानीसाठी बोकडांची खरेदी करण्यासाठी या तीन दिवसांत निर्बंध शिथिल करण्याचा निर्यण घेतल्याचे काश्‍मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग के. पोळ यांनी बुधवारी (ता.२२) सांगितले. ईदच्या व्यवस्थेसंबंधी झालेल्या आढावा बैठकीत पोळ बोलत होते. कोरोनाच्या काळात सर्व नियम पाळून कुर्बानीच्या प्राण्‍यांच्या विक्रीसाठी केंद्रे स्थापन करण्याची सूचना त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख