भारत-चीन संघर्षात मार्ग काढण्याचा अमेरिकेचा प्रयत्न - ट्रम्प

भारत व चीनमधील ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दोन्ही देशांशी चर्चा करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
America will mediate in India China war situation say Donald trump
America will mediate in India China war situation say Donald trump

वाॅशिंग्टन : भारत व चीनमधील ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दोन्ही देशांशी चर्चा करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ओक्लाहामा येथे आपल्या निवडणूक रॅलीसाठी जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या सोमवारी लडाख येथे भारत व चीन यांच्या सैनिकांत धुमश्चक्री झाली. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचरांच्या अंदाजानुसार या हल्ल्यात किमान ३५ चीनी सैनिक ठार झाले आहेत. 

उभय देश आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. काय होते आहे यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आम्ही या परिस्थितीतून दोन्ही देशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करु, असे ट्रम्प यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने उभे ठाकले आहे. चीनच्या सीमेवरील देश कोरोनाशी लढण्यात गुंतले आहेत व चीन त्याचा फायदा घेऊन सीमेवरील तणाव वाढवतो आहे, असा आरोप अमेरिकेने केला आहे. 

चीनची पिपल्स रिपब्लिक आर्मी जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताबरोबर सीमेवरील तणाव वाढवत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातही चीनने लष्करी हालचाली सुरु केल्या असून तिथेही बेकायदेशीरपणे जास्तीच्या जागेवर हक्क सांगितला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपीओ यांनी केले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com