अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मधील अभिनेत्यावर पोट भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याला बॉलीवूडमधील चंदेरी दुनियेतील अभिनेतेही अपवाद नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
akshay kumars coactor in sooryavanshi selling vegetables for suvival
akshay kumars coactor in sooryavanshi selling vegetables for suvival

नवी दिल्ली : कोरोना संकटाचा फटका सर्वच स्तरांतील नागरिकांना बसला आहे. याला बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेचा अपवादही नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. यामुळे अनेक कलाकारांना रोजीरोटीसाठी मिळेल ते काम करावे लागत आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत सूर्यवंशी चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्यावर तर आता भाजी विकण्याची वेळ आली आहे. 

कार्तिका साहू असे या अभिनेत्याचे नाव आहे. साहू हा मूळचा ओडिशातील केंद्रापाडा जिल्ह्यातील गरडपूर येथील आहे. तो १७ वर्षांच्या असताना बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आला होता. त्याने सुरूवातीला अनेक कलाकारांचा बॉडीगार्ड म्हणून काम केले. महानायक अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचाही तो बॉडीगार्ड होता. 

अखेर त्याचे नशीब चमकले ते २०१८ मध्ये. त्याने अनेक चित्रपटांतील अॅक्शन दृश्यांमध्ये काम केले. याचबरोबर अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटातही त्याला संधी मिळाली. त्याचा बॉलीवूडमधील अभिनयाचा प्रवास नुकताच सुरू होत असताना कोरोनाचा संकट आले. या संकटात चित्रपटगृहे बंद झाली. यासोबत चित्रपटांचे चित्रीकरणही बंद झाले. यामुळे त्याला मिळणारे कामही बंद झाले. 

देशभरात २२ मार्चला लॉकडाउन जाहीर करण्यात आले. साहू हा जयपूरमध्ये चित्रपटातील अॅक्शनदृश्ये चित्रीत करुन त्यावेळी नेमका ओडिशातील त्याच्या गावी परतला होता. तेव्हापासून तो त्याच्या गावी अडकला आहे. काही काम नसल्याने उदरनिर्वाह आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याला रोजगार हवा होता. परंतु, कोरोना संकटामुळे त्याला काही रोजगारही मिळत नव्हता. तब्बल चार महिने त्याने बेरोजगार म्हणून काढले. याच काळात आलेल्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये त्याच्याकडील होते तेवढे पैसेही संपले. 

अखेर साहू हा कामाच्या शोधात राजधानी भुवनेश्वरमध्ये आला. तिथेही त्याला रोजगार मिळाला नाही. अखेर त्याने भाजी विकण्याचा निर्णय घेतला. साहू आता भाजी विकून उदरनिर्वाह करीत आहे. एवढ्या बिकट परिस्थितीतही साहू आशावादी आहे. तो म्हणतो, कोरोनाची ही परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर मी पुन्हा बॉलीवूडमध्ये नशीब आजमावेन. तोपर्यंत हा जगण्याचा संघर्ष सुरूच राहील. 

कोरोनाची ही परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर मी पुन्हा बॉलीवूडमध्ये नशीब आजमावेन. तोपर्यंत हा जगण्याचा संघर्ष सुरूच राहील. 
- कार्तिका साहू, अभिनेता  

 Edited by Sanjay Jadahv

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com