अखिलेश यादव यांची नेटकऱ्यांकडून धुलाई

विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना कानपूरजवळ पोलिसांची गाडी उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा आहे. या दाव्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यात अखिलेशयादव यांनी भर टाकली आहे
Akhilesh Yadav.Being trolled for his comments about Google Maps
Akhilesh Yadav.Being trolled for his comments about Google Maps

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची नेटकऱ्यांनी चांगलीच थट्टा केली आहे. गँगस्टर विकास दुबेचा उज्जैनपासून कानपूरपर्यंतचा पोलिस पहाऱ्यातील प्रवास कसा झाला हे तपासण्यासाठी गुगल मॅपचा वापर करावा, अशी मागणी यादव यांनी केली होती. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. 

विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना कानपूरजवळ पोलिसांची गाडी उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा आहे. या दाव्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यात यादव यांनी भर टाकली आहे. पोलिसांच्या ताफ्यातल्या गाड्या कशा कशा वळल्या याची माहिती घेण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर करावा, अशी मागणी यादव यांनी काल केली होती. 

बॅरिकेडींग कसे केले गेले, गाडी कशी उलटली हे पाहण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. जर उशीर केला तर ही माहिती मिळू शकणार नाही, असे यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. त्यावर नेटकऱ्यांनी यादव यांची धुलाई सुरु केली. मात्र गुगल मॅप्सवर लाईव्ह व्ह्यू फीड किंवा मागील घटनांची दृश्य स्वरुपातील माहिती उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती असल्याने नेटकरी चेकाळले व त्यांनी यादव यांना लक्ष्य बनवले. 

गुगल मॅप्स आणि सीसीटिव्ही याच्यात काही फरक आहे की नाही, असा प्रश्न एकाने ट्वीटरवरुन विचारला आहे. अनेकांनी कार्टुन किंवा मिम्सच्या माध्यमातून यादव यांची थट्टा उडवली आहे. 

Edited By : Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com