विमानसेवेला पहिल्याच दिवशी गोंधळाचा फटका

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी २५ मे पासून विमान उड्डाणे सुरू होतील असे जाहीर केल्यामुळे प्रवाशांचा हुरूप वाढला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेल्या राज्यांकडून या योजनेला थंड प्रतिसाद आहे.
air travel resumes in india after two months
air travel resumes in india after two months

नवी दिल्ली : कोरोनाचे भय संपविण्यासाठी आजपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र लॉकडाउनमुळे प्रवाशांना झालेला त्रास तसेच राज्यांच्या नकारामुळे बरीच उड्डाणे रद्द करावी लागली. तब्बल ६२ दिवसांनंतर सुरू झालेल्या या उड्डाणांपैकी पहिले उड्डाण नवी दिल्लीहून पुण्यासाठी झाले. 

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ८० विमाने रद्द रण्यात आली. आजच्या पहिल्या दिवसाच्या नियोजनानुसार ११८ विमाने दिल्लीत उतरणे आणि १२५ विमानांचे उडा्डाण अपेक्षित होते. यासोबतच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही २४ विमाने उतरण्याचे तर २३ उड्डाणांचे वेळापत्रक होते. दिल्लीव्यतरिक्त मुंबई, बंगळूर आणि कोलकाता या वर्दळीच्या मार्गांना दिवसभरातील गोंधळाचा फटका बसला. 

पहाटे पावणे पाचला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने केलेल्या उड्डाणासोबत विमान वाहतुकीला पुन्हा प्रारंभ झाला. खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणाऱ्या प्रवाशांना चेहरा झाकणारे फेसशिल्डही पुरविण्यात आले होते. तर आर्थिक राजधानी मुंबईहून पाटणा येथे जाणारे विमान सकाळी पावणेसातला उडाले. मुंबईत विमान सेवा तत्काळ सुरू करण्यास राज्य सरकार फारसे अनुकूल नाही. केंद्र आणि राज्याच्या चर्चेनंतर उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. 

दिल्ली आणि जवळपासच्या शहरांमधील प्रवासी विमानाच्या वेळापत्रकानुसार दिल्ली विमानतळावर मात्र आयत्यावेळी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून उड्डाण रद्द झाल्याने या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. प्रवासी आणि प्रतिनिधींची यात वादावादीही झाली. विमान कंपन्यांकडून प्रवाशांना अखेरच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्याचे एसएमएस पाठविणअयात आले. विमान कंपन्यांच्या वेबसाईटवर मात्र वेळापत्रकानुसार उड्डाण असल्याचे दर्शविले जात होते. या विरोधाभासामुळे मध्यरात्री विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांची कोंडी झाली. 

या आहेत मार्गदर्शक सूचना 

- कोरोनाचे लक्षण नसलेल्या प्रवाशांना विलगीकरणाची गरज नाही. 
- घरी गेलेल्या प्रवाशांना चौदा दिवसांसाठी एकांतवासात राहावे लागेल. 
- विमानतळातून बाहेर जातानाही थर्मल स्क्रिनिंग गरजेचे 
- घरी विलगीकरणात असलेल्यांमध्ये नंतर कोरोनाची लक्षणे आढळल्यास केंद्र, राज्य किंवा जिल्ह्याच्या देखरेख केंद्राला माहिती द्यावी लागेल. 
- गंभीर लक्षणे आढळल्यास विशेष रुग्णालयात उपचार सुरू केले जातील. 
- सर्व प्रवाशांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक. 

दिवसभरात...

- महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाइन करणार 
- काही काळासाठी मुंबईत येणाऱ्यांना त्यातून सूट, त्यांना आपल्या प्रवासाचे सर्व तपशिल द्यावे लागतील 
- आंध्रात उद्यापासून, तर पश्चिम बंगालमध्ये २८ मे पासून उड्डाणे 
- दिवसभरात ५३२ उड्डाणे 
- ३९ हजार २३१ प्रवासी संख्या 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com