ज्योतिरादित्य, पायलटांनी ना पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या, ना सतरंज्या उचलल्या, मनीष तिवारींचा हल्लाबोल  - ‘Jyotiraditya, pilots did not eat police batons, did not pick up Sataranjya, Manish Tiwari | Politics Marathi News - Sarkarnama

ज्योतिरादित्य, पायलटांनी ना पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या, ना सतरंज्या उचलल्या, मनीष तिवारींचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कॉंग्रेसमधील ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांच्या बंडखोरीकडे लक्ष वेधले असता तिवारी यांनी प्रथमच या दोघांविषयी मौन सोडले.

नवी दिल्ली : " ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे कॉंग्रेसचे राजकुमार होते. या दोघांच्या वडीलांच्या दुर्दैवी मृत्युमुळे त्यांना पारंपरिक मतदारसंघ मिळाले मात्र या दोघांनी असे कोणते योगदान दिले होते की त्याचे कॉंग्रेसने दु:ख केले पाहिजे. ना त्यांनी कधी पक्षासाठी भिंती रंगविल्या ना, ना पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या ना तळागाळात पक्षासाठी प्रचार केला असा हल्लाबोल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. 

मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर सचिन पायलटांनी राजस्थानात बंडखोरी केली. त्यामुळे दोन्ही राज्यातील कॉंग्रेस सरकारे अडचणी आली. या सर्व पार्श्वभूमीवर मनीष तिवारी यांची हिन्दूने विशेष मुलाखत घेतली आहे.

डॉ. मनमोहनसिंग यांचा यूपी-2 चा कारभार याविषयी कॉंग्रेसमध्येच दोन प्रवाह आहेत. त्यावेळी स्वत: राहुल गांधींनी पंतप्रधान व्हायला हवे होते असे त्यांचे चाहते म्हणतात. गेल्या दोन दिवसापासून तर कॉंग्रेसमधील काही नेते डॉ. मनमोहनसिंग यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करीत आहेत. मात्र माजी मंत्री शशी थरूर त्यांच्या समर्थनार्थ सरसावले आहेत. 

कॉंग्रेसमधील ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांच्या बंडखोरीकडे लक्ष वेधले असता तिवारी यांनी प्रथमच या दोघांविषयी मौन सोडले. त्यांच्या राजकारणाचाच समाचार घेतला.

ते म्हणाले,की कॉंग्रेसमध्ये कोणतीही गडबड नाही. शेवटी पक्ष मोठा असतो. व्यक्ती नाही. ज्योतिरादित्य आणि पायलट हे कॉंग्रेसमधील राजकुमार होते. त्यामुळे त्यांनी तळगाळात कधी कामच केले नाही. जरी हे दोन्ही नेते पक्षाबाहेर गेले असले तरी त्यांची पक्षात कोणतेही उपेक्षा झाली नव्हती हे प्रथम मला स्पष्ट करावे लागेल. या दोघा नेत्यांना त्यांच्या पित्यांचा वारसा लाभला आहे. 

ज्योतिरादित्य किंवा सचिन पायलट यांना त्यांच्या वडीलांनी प्रतिनिधीत्व केलेले आयते मतदारसंघ मिळाले. त्यांना पक्षाने नेहमीच पाठबळ दिले. ते एनएसयूआय किंवा आयवायसी सारख्या युवकांच्या संघटनातून पुढे आलेले नेतृत्व नाही. त्यांनी कॉंग्रेसच्या सार्वजनिक सभेमध्ये कधी सतरंज्या पसरल्या नाहीत किंवा उचलल्याही नाहीत. ना कधी पक्षासाठी भिंती रंगविल्या आहे. कधी पोलिसांच्या लाठ्याकाठ्याही खालेल्या नाहीत अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. 

जसे पायलट, शिंदे आहेत तशाच प्रियका चतुर्वेदी, अजोयकुमार, प्रद्योत मनीका यांच्यासारखे अनेक लोक पक्षात होते. त्यांना स्वत:ची अशी कोणतीही आयडियालॉजी नाही किंवा पक्षाबरोबर त्यांचे कोणचेही भावनात्मक नाते नाही.आयात केलेल्या नेत्यांना खासदार, आमदारच काय मंत्रीही केले जाईल, पण, त्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार नाही असा मला विश्वास वाटतो असेही मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख