BIG Breaking - आपत्कालिन प्रसंगी वापरास सिरमच्या लशीला मान्यता

देशातील कोरोनाच्या साथीवर नियंत्रण आणणण्यासाठी आपत्कालिन परिस्थितीत पुण्याची सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक यांच्या कोरोना प्रतिबंधक लशीला देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलनी मान्यता दिली आहे. काही वेळापूर्वीच दिल्लीत ही घोषणा करण्यात आली.
Covid Vaccine Restricted use permitted
Covid Vaccine Restricted use permitted

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या साथीवर नियंत्रण आणणण्यासाठी आपत्कालिन परिस्थितीत पुण्याची सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक यांच्या कोरोना प्रतिबंधक लशीला देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलनी मान्यता दिली आहे. काही वेळापूर्वीच दिल्लीत ही घोषणा करण्यात आली.

देशात कोरोना लशीच्या चाचण्यांचा ड्रायरन काल पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ड्रग्ज कंट्रोलर जनरलनी देशवासियांना ही नववर्षाची भेट दिली आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दरम्यान, या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. कोविड मुक्त राष्ट्राच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. ही लस शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांचे मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

पुण्यात आॅक्सफर्डच्या सहाय्याने सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेली कोविशिल्ड व भारत बायोटेक बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्य मर्यादित वापराला परवानदी देण्यात येत असल्याचे देशाचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल व्ही. जी. सोमाणी यांनी पत्रकारांना सांगितले. या दोन्ही कंपन्यांनी आमच्याकडे चाचण्यांचे निष्कर्ष सादर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन्ही लशी शंभर टक्के सुरक्षित असून थोडीही शंका असती तर आम्ही त्यांच्या वापराला परवानगी दिली नसती, असे सोमाणी यांनी सांगितले. 

दरम्यान गेल्या चोवीस तासातील देशातली कोविड स्थिती खालीलप्रमाणे -
नवे रुग्ण - १८१७७
बरे झालेले रुग्ण - २०९२३
मृत्यू - २१७
आतापर्यंतच्या कोविड केसेस - १,०३,२३,९५६
अॅक्टिव्ह रुग्ण - २,४७,२२०
एकूण बरे झालेले रुग्ण - ९९,२७,३१०
एकूण मृत्यू - १,४९, ४३५
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com