सेनेची तोफ गुलाबराव पाटील गाजविणार बिहारचा फड - Uddhav Thackeray To campaign in Bihar Assembly Elections | Politics Marathi News - Sarkarnama

सेनेची तोफ गुलाबराव पाटील गाजविणार बिहारचा फड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कुशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी, हे बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करणार आहेत.

पुणे : शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वीस स्टार कँपेनर्सची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत जळगावचे कट्टर शिवसैनिक व मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कुशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी, हे या निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करणार आहेत.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे.  

"सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आले. यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता हे लोकांना समजत होते. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केले गेले. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करु. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवणार आहोत. २०१५ ला देखिल शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, त्यावेळी शिवसेनेला दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती," असे काल शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले होते. 

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या पांडेंविरोधात उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. पण पांडे यांना तिकीट मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख