पूनावालांचे दातृत्व : सीरमच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख - Serum announces Rs 25 lakh each to the families of the deceased | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

पूनावालांचे दातृत्व : सीरमच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली होती. यामध्ये मृत्यूमुखी पडलेले मजुर व त्यांच्या कुटूंबियांविषयी पुनावाला यांनी दु:ख व्यक्त केले. 

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या पाच मजुरांच्या कुटूंबियांना संस्थेकडून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी या मदतीची घोषणा केली आहे. 

पुण्यातील मांजरी येथील विशेष आर्थिक क्षेत्रात काम सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली होती. यामध्ये मृत्यूमुखी पडलेले मजुर व त्यांच्या कुटूंबियांविषयी पुनावाला यांनी दु:ख व्यक्त केले. आहे. तसेच मजुरांना नियमानुसार मिळणाऱ्या मदतीशिवाय प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या संकटकाळात मदत केलेल्यांबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती.   

कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, तो विभाग सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागली होती. कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोरोना लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कोरोनाची लस ठेवण्यात आलेल्या बिल्डिंग कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले.  सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. 

अजित पवार यांनी दिली भेट...

सीरम इन्स्टिटयूटमधील आग नेमकी कशामुळे लागली हे आताच निश्‍चितपणे सांगता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. पवार यांनी रात्री सीरम इन्स्टिटयूटला भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. या घटनेची समांतर चौकशी पुणे पोलिसांचा गुन्हे अन्वेशन विभाग करणार आहे.

आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला. या कामगारांच्या कुटुंबियांना सीरमच्यावतीने प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना पालकमंत्री अजित पवार म्हणाले, "" या आगीत मनुष्यहानी झाली ही दु;खदायक आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर येत नाही. चौकशीअंती ते कळेलच. मात्र, यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वच सार्वजनिक संस्थांचे फायर ऑडीट अत्यावश्‍यक असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.''

या घटनेची चौकशी हडपसर पोलीस चौकशी करणार आहे. मात्र, सीरम सारखी महत्वाची संस्था आहे. कोरोनाची लस तयार होत असल्याने साऱ्या जगाचे लक्ष या संस्थेकडे आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना लसीच्या उत्पादनाचे काम सध्या येथे वेगाने सुरू आहे. मोठा अपघात झाला असला तरी कोरोनाची लस ठेवण्यात आली आहे तसेच ज्या इमारतीत या लशीच्या उत्पादन होत आहे. सुदैवाने या इमारतीला आगीची झळ बसलेली नाही. या घटनेत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. काम करणारे सर्व कामगार ठेकेदाराकडे काम करणारे होते. यामध्ये बिहारमधील एक उत्तर प्रदेशमधील दोन व पुण्यातील दोन अशा पाच जणांचा समावेश आहे, असे सांगण्यात येत आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख