आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केला... तरी ते निवडून आले, असे पवारही म्हणाले! 

आझाद यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद यांच महाराष्ट्राशी असले नात उलगडून दाखवल.
sharad pawar, Ghulam Nabi Azad .jpg
sharad pawar, Ghulam Nabi Azad .jpg

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आझाद यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद यांच महाराष्ट्राशी असले नात उलगडून दाखवल. 

पवार म्हणाले, आझाद यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. आझाद सुरुवातीच्या काळात संघटनेशी जोडले गेले होते. राजकारणाची सुरुवात त्यांनी जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाच्या रुपाने केली. पुढे काँग्रेसच्या तत्कालीन वरिष्ठ नेत्यांनी त्यांना युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आझाद यांच्यासाठी १९८२ हे वर्ष अविस्मरणीय राहिले असेल. कारण, याच वर्षी त्यांचे लग्न झाले आणि याच वर्षी त्यांना महाराष्ट्रातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली. 

''त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. मी प्रचारात म्हणत होतो की, कश्मीरवरुन आलेल्या आमच्या सहकाऱ्याला निवडून देऊ नका. त्यांच्याविरोधात आम्ही अनेक प्रचारसभा घेतल्या, तरीही ते मोठ्या मताधिक्याने वाशिममधून निवडून आले. आझाद यांनी वाशिमच्या लोकांचा विश्वास जिंकला होता. त्यांनी सातत्याने वाशिमच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. सिंचन, शेती, शिक्षण अशा क्षेत्रातील समस्या कशा दूर केल्या जातील, त्यावर त्यांनी काम केले. कश्मीरवरुन आलेले आमचे सहकारी वाशिमच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, हे वाशिमची जनता कधीही विसरली नाही,'' अशा शब्दांत पवार यांनी आझाद यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते उलगडून दाखविले. 

यावेळी आझाद म्हणाले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांचे विचार वाचून देशभक्ती शिकलो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे आभार मानत गुलाम नबी म्हणाले की, त्यांच्यामुळेच मी येथे पोहोचू शकलो. काश्मीरची परिस्थिती पूर्वी कशी होती आणि आता किती बदल झाला हे त्यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानबद्दल आपले मत व्यक्त केले. 

आझाद म्हणाले की, मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या एसपी महाविद्यालयात शिकत होतो. तेथे १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट दोन्ही साजरे करण्यात येत होते. १४ ऑगस्ट ( पाकिस्तानचा स्वातंत्र दिन) साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझ्य काही सहकाऱ्यांनी  १५ ऑगस्ट साजरा केला तिथे फार कमी लोक होते. आम्ही त्यानंतर एका आठवडभर महाविद्यालयात गेलो नाही. कारण तेथे मारहाण होत होती. तो काळ आणि आजचा काळ यामध्ये खूप बदल झाला आहे. 

''मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे की जे कधीच पाकिस्तानात गेले नव्हते. तेथे कशा प्रकारची परिस्थिती आहे, याचा विचार केला तर मला अभिमान वाटतो की, आपण हिंदुस्तानी मुसलमान आहे. जगातील कोणत्या मुसलमानाने अभिमान बाळगला पाहिजे, तर तो भारतातील मुस्लिमांनीही बाळगला पाहिजे. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत, मुस्लिम देश एकमेकांशी भांडून संपत आहेत. तेथे कोणीही हिंदू किंवा ख्रिश्चन नाही, ते आपापसात भांडत आहेत. पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत, खुदाने त्या आमच्या मुस्लिमांमध्ये कधीही येऊ देऊ नये'', असे आझाद म्हणाले. 

''मुख्यमंत्री झाल्यानंतर मी प्रथम सोपोरमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेथून तीन वेळा गिलानी साहेब आमदार निवडून गेले. त्या बैठकीत मी म्हणालो होतो की, जर माझ्या सरकारमधील मंत्र्याने धर्म किंवा मशिदी किंवा पक्षाच्या आधारे न्याय केला, तर मला त्यांची लाज वाटेल'', असे आझाद यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com