संसदेत जॅमर असताना फक्त जिओ कंपनीलाच नेटवर्क कसे?

संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का?
संसदेत जॅमर असताना फक्त जिओ कंपनीलाच नेटवर्क कसे?
Srirang Barne .jpg

पिंपरी : संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का? जिओचे मोबाईल नेटवर्क जॅमरच्या बाहेर आहे का? केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. २३ मार्च)लोकसभेत केली.

बारणे म्हणाले, संसदेचे कामकाज सुरू असताना कोणाचेही फोन लागू नयेत यासाठी जॅमर लावले जातात. केंद्र सरकारची बीएसएनएल आणि एमटीएल कंपनीही त्याला अपवाद नाही. देशभरात या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत देखील नाही.
लोकसभेत बीएसएनएल, एमटीएलचे नेटवर्क चालत नसताना फक्त जिओचे नेटवर्क येत आहे. 

जिओला सपोर्ट केले जाते. मग सरकारी कंपनीला जॅमरच्या बाहेर ठेवणे योग्य नाही. जिओवर का मेहरबानी दाखविली जात आहे. त्यांना संसदेत विशेष सूट का देण्यात आली. त्यांचे मोबाईल नेटवर्क जॅमरच्या बाहेर का आहे?  केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे? असे विविध सवाल खासदार बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले. त्यावर पीठासीन अधिकारी रमादेवी यांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतील, असे सांगितले. 

हे ही वाचा...

कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुन्हा रेड, ऑरेंज आणि यलो झोन 

पिंपरी : कोरोनाचा उद्रेक झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना आता दंड नाही, तर थेट फौजदारी कारवाईला पिंपरी-चिंचवडमध्ये सामोरे जावे लागणार आहे. तसेच शहरात पुन्हा रेड, ऑरेंज, यलो झोन तयार करण्यात येणार आहे. तर, जास्त कोरोना रुग्ण आढळलेले भाग आणि कोरोना नियम तोडणारी दुकाने सील केली जाणार आहे. 

दरम्यान, काल सोमवार (ता. २२ मार्च) शहरात पुन्हा हजाराच्या वर रुग्ण (११८७) सापडले, तर तब्बल १६ जणांचा मृत्यू (त्यात पालिका हद्दीबाहेरील पाच) झाल्याने पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन कारवाई आणखी कडक करण्याचे आदेश दिले. त्यासाठी पालिका प्रशासन आता पोलिसांचीही मदत घेणार आहेत.  
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in