प्रतिमा सावरण्यासाठी नरेंद्र मोदींकडून पुस्तक वितरण मोहिम

नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी असल्याची प्रतिमा तयार होऊ लागली आहे. याची धास्ती घेऊन पंतप्रधानांची प्रतिमा उंचावण्यासाठी आता थेट पुस्तक वितरण मोहिम सुरु करण्यात आली आहे.
Narendra Modi
Narendra Modi

नाशिक : नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी असल्याची प्रतिमा तयार होऊ लागली आहे. याची धास्ती घेऊन पंतप्रधानांची प्रतिमा उंचावण्यासाठी आता थेट पुस्तक वितरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. देशातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना ही पुस्तके पाठविण्यात आली आहेत. 

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 120 दिवसांपासून दिल्लीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरु आहे. त्यात शेतकरी किंचीतही माघार घेण्यास तयार नसल्याने केंद्र सरकार शेतकरी व शीख सामुदायाच्या विरोधात आहे असा संदेश गेला आहे.

देशातील सर्वच शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार काहीसे बॅकफूटवर आले आहे. यातून सारवण्यासाठी भाजपने खासदारांच्या पत्रकार परिषदा, सोशल मिडीयावरील मोहिम यांसह अनेक प्रयोग केले आहेत. त्यात एका नव्या प्रयोगाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी व शीख समाजाचे हितचिंतक आहेत असा संदेश असलेली मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार ‘अन्नदात्याच्या कल्याणासाठी समर्पित मोदी सरकार’ आणि ‘पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीख समुदायाशी असलेले विशेष नाते’ ही दोन पुस्तके तयार करण्यात आली आहेत. ही पुस्तके देशातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी मोहिम चर्चेचा विषय ठऱली आहे. 

पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाने भाजपला नुकसान होऊ शकते. याचा विचार करुन ही पुस्तके पाठविण्यात येत आहेत. देशभरातील नाराज शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने आता पुस्तक भेटीतून शेतकऱ्यांशी नाते जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी व शीख समूदायाप्रती स्नेह दाखविण्याचा प्रयत्न पुस्तकातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

कृषी कायद्यांवरुन देशात आंदोलनावर आंदोलन होत आहे. या आंदोलकांशी कोणताही संपर्क पंतप्रधानांचा झालेला नाही. संसदेत त्यांनी शेतकरी चर्चेला आल्यास स्वागत आहे, असे निवेदन केले होते. मात्र त्याला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. यात शेतकरी हा मोठा घटक विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले. शेतकरी देशातील राजकारणावर मोठा प्रभाव टाकतात. हे लपुन राहिलेले नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी कार्यालयाने जिल्हा परिषद अध्यक्षांना पुस्तके पाठविली. मात्र बहुतांश जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे नाहीत. त्यामुळे त्याचा कितपत उफयोग होईल हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

काय आहे पुस्तकात...
पहिल्या पुस्तकात मोदी सरकारच्या कृषी सुधारणाबाबतचे सत्य मांडण्यात आले असून यात कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था कायम राहणार, बाजार समितीचे कामकाम सुरू राहणार यासह तर दुसऱ्या पुस्तकामध्ये दरबार साहिबसाठी एफसीआरए नोंदणी, करमुक्त लंगर, करतारपूर साहिब मार्गिका, शीख युवकांना सुदृढ करणे, पंजाबच्या विकासाला गती, अन्य दुसऱ्या विषयी माहीती आहे.

सोडून गेलेल्यांची आठवण !
शेतकरी विधेयकांचा विषय पंजाब, हरियाणा या राज्यांत अत्यंत संवेदनशील आहे. याची जाणीव असल्याने भाजपचा सहकारी अकाली दलाने त्यांची साथ सोडली. या पक्षाच्या केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी या विषयावरून सातत्याने अतिशय प्रखरपणे केंद्र सरकारवर टिका केली आहे. मात्र मोदी यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्टावर अकाली दलाच्या नेत्यांसमवेत छायाचित्र आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com