कोरोना संपला, मोदीजी आता मंदिरे उघडा...अखाडा परिषदेची पंतप्रधानांकडे मागणी

'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करुन सर्व धार्मिक संस्था, मठ, मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. ही मंदिरे आता भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी अखिल भारतीय अखाडा परिषदेने केली आहे.
Akhada Parishad Demands to Open Religious Places
Akhada Parishad Demands to Open Religious Places

नाशिक : 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहिर करुन सर्व धार्मिक संस्था, मठ, मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. ही मंदिरे आता भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी अखिल भारतीय अखाडा परिषदेने केली आहे. 

यासंदर्भात अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी आणि महामंत्री महंत हरि गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणतात, ''कोरोना विषाणूने केवळ भारतच नाही तर सबंध जग संकटात सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय साहसी निर्णयाने भारतात कोरोनाच्या महामारीचे संकट जवळपास संपुष्टात आले आहे. त्यादृष्टीने देश अग्रेसर झाला आहे. पंतप्रधानांच्या संदेश आणि निर्णयांचे सर्व संत, महंत, तीर्थक्षेत्र, पुरोहित, सर्व मंदिरे, मठ आणि पुजारी यांनी स्वागत केले आहे,''

ते पुढे म्हणतात, ''जवळपास दोन महिन्यांपासून देशातील सर्व लहान, मोठी मंदिरे बंद आहेत. त्यात केवळ पूजा अर्चना होते. भाविकांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व भक्त तसेच संतांच्या वतीने आपण या मंदिरांची दारे आता भाविकांसाठी खुली करण्याचे आदेश द्यावेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व दक्षता घेण्यात येतील. मंदिरांमध्ये कोरोनापासून बचावासाठी सॅनीटायझर, मास्क, प्रत्येकासाठी साबणाने हात धुण्याची व्यवस्था, भाविकांत दोन मीटरचे अंतर ठेऊन दर्शनाची परवानगी या सर्व नियमांचे काटोकोर पालन केले जाईल,''

अखिल भारतीय अखाडा परिषद ही देशातील सर्व साधू, महंत व मठ व मंदिरांची प्रतिनिधीक संघटना आहे. त्याचे पदाधिकारी विविध आखाड्यांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे केंद्र व विविध राज्य शासनावर त्यांचा प्रभाव आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्वच तीर्थस्थळांवर सध्या भाविकांचा संपर्क व धार्मिर कार्य जवळपास बंद झालेली आहेत. त्याचा ही शहेर तसेच धार्मिक संस्थांच्या कामकाजावर, व्यापार उदीमावर देखील परिणाम झाला आहे. त्यादृष्टीने अखाडा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सध्या बंद आहेत. त्यामुळे अखाडा परिषदेच्या विनंतीला काय प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com