नाशिकमधील हेरगिरीसाठी पाकिस्तानचा लंडनहून ट्रॅप - HAL Spying Case has London Connection  | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमधील हेरगिरीसाठी पाकिस्तानचा लंडनहून ट्रॅप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्वाच्या आस्थापना असून महिनाभरात दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात, दोन्ही जण निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे.

नाशिक :  हिंदुस्थान एरोनॅटीक्स लिमीटेड (एचएएल) मधील दीपक शिरसाठ तसेच तोफखाना केंद्रातील मजूर संजीवकुमार या दोघेही सहज पाकिस्तानी कट कारस्थानांना बळी पडले. नाशिकमध्ये कुणाभोवतीही सापळा लावला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी दूरध्वनीबाबत जागरूकपणे वागा, विशेषतः ग्रुप ॲडमिनने काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.

नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्वाच्या आस्थापना असून महिनाभरात दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात, दोन्ही जण निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे. शहरातील या दोन्ही घटनांबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन निवेदन केले.

श्री पांडे म्हणाले की, महिनाभरातील नाशिकमधील दोन्ही घटना बघता, पाकिस्तानकडून भारतात माहिती देणारे एजंट तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे हेच पुढे येते आहे. त्यामुळे हनी ट्रॅप मध्ये कुणीही फसू शकतो. सहज उत्सुकता म्हणून विदेशी नागरिकांशी संवाद साधाल तरी फसाल. तुम्ही हनी ट्रॅपमध्ये फसाल याची भनकही लागत नाही इतक्या सहजपणे माणूस जाळ्यात अडकतो.

लंडनहून ट्रॅप
दहशतवाद प्रतिबंधक विभागाने अटक केलेला आणि पाकीस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला दीपक शिरसाठ असाच लंडन येथील एका संवादात अडकला. त्यात त्याने २०१९ मध्ये संवेदनशील स्वरुपाची माहिती दिली. एखाद्या मुलीला विमानाविषयी एवढी माहिती असू शकते. या कुतूहलापोटी तो सहज फसत गेला. २०१९ मध्ये संवेदनशील माहीती दिली. कुणाशी असा संवाद साधला जाउ शकतो. त्यामुळे कुतुहूल म्हणूनही अनोळखी विदेशी व्यक्तीशी संवाद टाळा. लक्षात येणार नाही. इतक्या अलगद पणे लोक फसतात. नकळत पणे महत्वाची संवेदनशील माहीती देउन बसतात तशी वेळ कुणावरही येउ शकते. त्यामुळे नागरिकांनी जागरुकपणे सोशल मिडीयावर संर्पक ठेवावा. असे आवाहान केले.

तोफखान्यातील हेरगिरी
तोफखाना केंद्राच्या फोटोबाबत हनी ट्रॅप नव्हता. विदेशी तरुणांच्या ग्रुपशी संवाद साधायच्या उत्सुकतेत संजीवकुमार (बिहारी मजूर) फसल्याचे पुढे आले आहे. दरवेळी ट्रॅप हा हनी असेलच असे नाही. तो कसाही असू शकतो. संजीवकुमार यानेही ९२३०३५३४२२८९ या पाकिस्तानी नागरिकांच्या सलमान व इब्राहीम नावाच्या व्हॉटसग्रुपवर फोटो पाठविले. त्याची चौकशी सुरु असून येत्या ३० आॅक्टाबरपर्यत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या बॅक खात्याची माहीती घेण्यात आली असून त्यात कुठलीही संशयास्पद माहीती पुढे आलेली नाही. त्यामुळे काळजी घ्यावी. देशाबाहेरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू नये. व्हॉटसग्रुपमध्ये अनोळखी विदेशींना थारा देऊ नये. असेही आवाहन त्यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख