नवी दिल्ली : महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातल्या दोन शहरांसाठी मोदी सरकारने २०२१ च्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. नाशिक व नागपूर या दोन शहरांतल्या मेट्रोसाठी अनुक्रमे २ हजार ९२ व ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही वेळापूर्वी संसदेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. कोरोनाच्या काळात होरपळलेल्या देशाला सावरण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. शेती, उद्योग, बांधकाम अशा सगळ्याच क्षेत्राचे लक्ष्य अर्थसंकल्पावर आहे. दरम्यान कोविड लसीकरणासाठी ३५ हजार ४०० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. वाहतूक क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पा मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बस वाहतुकीसाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. तर ३२ विमानतळांवर अत्याधुनिक यंत्रणा बसविणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी
- मुंबई -कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
- राष्ट्रीय रेल्वे योजना - २०३० ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा
- एलआयसीचा आयपीओ येणार
- बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित रहावा म्हणून तरतूद करणार
- सरकारी बँकांसाठई २० हजार कोटींची तरतूद
- विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली
Edited By - Amit Golwalkar

