येडियुरप्पांना लवकरच मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात येणार : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा  - Yeddyurappa to be removed from CM post soon: Senior BJP leader | Politics Marathi News - Sarkarnama

येडियुरप्पांना लवकरच मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात येणार : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

येडियुरप्पा यांचा​ उत्तराधिकारी उत्तर कर्नाटकमधील असेल.

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यांना लवकरच मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात येईल आणि त्यांचा उत्तराधिकारी उत्तर कर्नाटकमधील असेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. 

विजापूर शहर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार यत्नाळ म्हणाले, ""आमच्याच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला देण्यात आलेले 125 कोटी रुपये परत घेतले. यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात वाद झाला. ते फक्त शिमोग्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत. नाराज असलेले भाजपचे आणखी एक वरिष्ठ आमदार उमेश कत्ती यांच्या विधानाचा हवाला देऊन, येडियुरप्पा केवळ शिमोग्याचे मुख्यमंत्री असल्याप्रमाणे कार्य करत असल्याचा आरोप केला. 

जर 125 कोटी रुपये परत घेतले गेले नसते तर गॅंगबॉडीमधील सर्व रस्ते सिमेंटचे झाले असते. मी निधीसाठी लढत आहे आणि मी तो जाऊ देणार नाही. मला तो मिळेल. आम्ही त्यांच्या घरांसमोर जसे रांगेत उभे राहत आहोत, त्याप्रमाणे बंगळूरच्या लोकांनी विजापूरमध्ये आपल्या घरासमोर रांगेत उभे राहिले पाहिजे.' 

पुढचा मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचा असला पाहिजे, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ला पटवून देत आहेत, असा दावा यत्नाळ यांनी केला. सन 2018 च्या निवडणुकीत लिंगायत बहुल उत्तर कर्नाटकात भाजपने मोठा विजय मिळविला. यत्नाळ आणि येडियुरप्पा दोघेही लिंगायत आहेत. उत्तर कर्नाटकातील लोकांमुळेच या भागातीलच भाजपचा एखादा नेता मुख्यमंत्री होऊ शकेल. 

मंड्या, चामराजनगर किंवा कोलारमधील लोक आपल्याला मतदान करतात का? आम्ही उत्तर कर्नाटकातून 100 आमदार पाठवतो, तर ते केवळ 15 पाठवतात, असे ते म्हणाले. हायकमांडनेही हे ओळखले आहे. स्वत: पंतप्रधानांना खात्री आहे की, येडीयुरप्पानंतर मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल, हे जवळजवळ निश्‍चित केल्याचे आमदार यत्नाळ म्हणाले. 

आमदार यत्नाळ दिवास्वप्न पाहत आहेत. मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. संपूर्ण प्रदेशात भाजपची सत्ता आहे. विकासाचा विषय येतो, तेव्हा आम्ही उत्तर कर्नाटकला पाठिंबा देतो. नेतृत्वाचा निर्णय हायकमांडकडून घेतला जातो. येडियुरप्पा चांगले काम करतील. उत्तर कर्नाटकातील आमदार भाजप व येडियुरप्पा यांच्याबरोबर आहेत, यत्नाळ यांच्याबरोबर नाहीत, असे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदाची जागा सध्या रिक्त नाही. मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी असेल, तर टॉवेल्स लावता येतील. सीट रिक्त नसताना टॉवेल कुठे ठेवता? मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक जिंकली. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वात सरकार उर्वरित तीन वर्षांची सेवा देईल. 
-आर. अशोक, महसूल मंत्री 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख