Akali Dal EX MLA Complaints against Bollywood Actors | Sarkarnama

करण जोहर, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर 'या' तक्रारीमुळे येणार अडचणीत?

उमेश घोंगडे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

या पत्रानुसार 'एनसीबी'ने कारवाई केल्यास बडे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, दीपिका पदुकोन, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, वरून धवन, विकी कौशल व इतरांची नावे या तक्रारीत समाविष्ट आहेत.

पुणे : अंमली पदार्थांच्या पार्टीत सहभागी झालेल्या हिंदी चित्रपट कलाकारांविरोधात गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या पार्टीची चौकशी करून आघाडीच्या कलाकारांवर कारवाई कण्याची मागणी करणारे पत्र दिल्लीतील अकाली दलाचे माजी आमदार मनजिन्दरसिंह सिरसा यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) महासंचालक राकेश अस्थाना यांना दिले आहे.

या पत्रानुसार 'एनसीबी'ने कारवाई केल्यास बडे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, दीपिका पदुकोन, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, वरून धवन, विकी कौशल व इतरांची नावे या तक्रारीत समाविष्ट आहेत.

माजी आमदार सिरसा यांनी 'एनसीबी'ला दिलेल्या पत्रानुसार गेल्या वर्षी २८ जुलै २०१९ रोची मुंबईत ही ड्रग्ज पार्टी झाली आहे. या पार्टीत वरील सर्व कलाकार व काही अन्य लोक सहभागी झाली होते. एक ऑगस्ट २०१९ रोजी या संदर्भात मुंबई पोलीस आायुक्तांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. २८ जुलै रोजी झालेली पार्टी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या बांद्रा येथील घरी झाली असून जोहर यांचीच आयोजित केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

चित्रपट सृष्टीतील कलकार व ड्रग्ज माफियांसंदर्भाने सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या पाश्‍र्वमूमीवर सिरसा यांनी दिलेल्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पार्टीचे सर्व पुरावेदेखील सादर करण्यात आले असून या चौकशीतून ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट पुढे येण्याची शक्यता असून 'एनसीबी'ने तातडीने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार सिरसा यांनी केली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांना 'एनसीबी'ने अटक केल्यानंतर यातून बरीच नावे पुढे आली आहेत. त्यातील काहींना ‘एनसीबी’ चौकशीला बोलविणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन सहीत आघाडीच्या कलाकारांची नावे या तक्रारीत असल्याने यास वेगळे महत्व आहे. चित्रपटसृष्टीतील या सर्व प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत हिने करण जोहर यांचे नाव वारंवार घेतले आहे. या तक्रारीतही जोहर यांचेच नाव प्रामुख्याने असल्याने कंगनाने केलेल्या आरोपांना एकप्रकारे पुष्टी मिळत आहे. कलाकारांच्या विरोधात तक्रारी होऊनदेखील त्यांना वारंवार कोण आणि कशासाठी वाचवत आहे, असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख