`एमआयएम’ची धास्ती आता तृणमूल कॉंग्रेसला ! - Trinamool Congress Facing Threat from MIM | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

`एमआयएम’ची धास्ती आता तृणमूल कॉंग्रेसला !

श्यामला राॅय
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ या हैदराबादस्थित पक्षाने जे यश मिळवले त्यामुळे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. असदउद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालचा ‘एमआयएम’ हा पक्ष पश्‍चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंगेसची डोकेदुखी ठरू शकतो. कारण पश्‍चिम बंगालमध्ये अल्पसंख्य समुदायाची संख्या जवळपास २८ ते ३० टक्के आहे. 

कोलकता  : बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ या हैदराबादस्थित पक्षाने जे यश मिळवले त्यामुळे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. असदउद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालचा ‘एमआयएम’ हा पक्ष पश्‍चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंगेसची डोकेदुखी ठरू शकतो. कारण पश्‍चिम बंगालमध्ये अल्पसंख्य समुदायाची संख्या जवळपास २८ ते ३० टक्के आहे. 

बिहारचे जे जिल्हे, पश्‍चिम बंगालच्या सीमेला लागून आहेत तिथल्या जागापैकी चार जागांवर ‘एमआयएम’ने विजय मिळवला आहे. बंगालमधील माल्दा आणि उत्तर बंगाल या दोन जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मतदारसंघात ‘एमआयएम’ विजयी झाली आहे. मुळात या पक्षाने बिहारमध्ये २० जागा लढवल्या आहेत, त्यापैकी पाच जागांवर त्या पक्षाला यश मिळाले आणि त्यातल्या चार जागा या पश्‍चिम बंगालच्या सीमेलगतच्या आहेत.

‘एमआयएम’ ने बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनसमोर मोठ्या अडचणी निर्माण केल्या होत्या, या पक्षाच्या उमेदवारांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालच्या ‘एनडीए’ आघाडीतील उमेदवारांना फायदा झाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवले आहे. बिहारच्या निवडणूक प्रचारातच ओवेसी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष उतरेल अशी घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांच्या पक्षाने राजद आणि कॉंग्रेसची मते खाल्ली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

बिहारसारखा ‘एमआयएम’चा धक्का आपल्याला बसू नये यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी आत्तापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. ओवेसी यांचा प्रभाव ज्या दोन जिल्ह्यात पडू शकेल अशी तृणमूलला शक्यता वाटत आहे तिथे पक्षाने काम सुरू केले आहे. बिहारला लागून असलेल्या या भागात केवळ उर्दू भाषा बोलणाऱ्या अल्पसंख्य समाजावर ओवेसी यांचा प्रभाव पडेल अशीही शक्यता त्यांना वाटत आहे. बंगाली भाषा बोलणारा जो अल्पसंख्य समाज आहे त्याच्यावर ओवेसी याचा प्रभाव पडणार नाही असा तृणमूल कॉंग्रेसला विश्‍वास वाटत आहे. 
त्याचबरोबर या पक्षाचे नेते एक युक्तिवाद असाही करत आहेत. तो म्हणजे, अल्पसंख्य म्हणजे मुस्लीम समाज भाजपला हरवू शकणाऱ्या पक्षालाच मतदान करतो आणि या राज्यात तरी भाजपला हरवू शकण्याची क्षमता फक्त तृणमूल कॉंग्रेसमध्येच आहे आणि याची जाणीव त्या समाजाला आहे त्यामुळे हा समाज ओवेसी यांच्या पक्षाला मतदान करणार नाही. तृणमूलची रणनीती या गृहितकावरच ठरवली जात आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख