अभिनेता सोनू सूद पंजाबमध्ये निवडणूक जनजागृती करणार - Sonu Sood to create Electoral Awareness in Punjab | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

अभिनेता सोनू सूद पंजाबमध्ये निवडणूक जनजागृती करणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता सोनू सूदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी  त्याच्या नियुक्तीसंदर्भात आयोगाकडून एक पत्रदेखील जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई :  भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता सोनू सूदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी  त्याच्या नियुक्तीसंदर्भात आयोगाकडून एक पत्रदेखील जाहीर करण्यात आले आहे. सोनू वेगवेगळ्या विषयांबाबत लोकांना जागरूक करत असतो. आता लवकरच सोनू पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयाबाबत लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करताना दिसणार आहे. सोनू आता पंजाबमध्ये निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जनजागृती करणार आहे.

याबाबत बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू म्हणाले, 'सोनू सूद यांना स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त करण्यासाठी पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भारतीय निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठविला होता. नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने या प्रस्तावास मंजुरी दर्शवली आहे. ज्याच्या मंजुरीस मान्यता देण्यात आली आहे.'

सोनू सूद आता पंजाबमध्ये निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जनजागृती करेल. सोनू सूद मूळचा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील आहे. हिंदीव्यतिरिक्त त्याने तमीळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबीसह अन्य भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख