...म्हणून मोदींना बांगलादेश मुक्तीलढ्याचा ताम्रपटच द्यायला हवा!

बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशमध्ये बोलताना केले होते. 20-22 वर्षांचे असताना आपण हा सत्याग्रह केल्याची माहिती मोदी यांनी दिली होती. त्यावरून सोशलमिडियावरुन बराच गदारोळ झाला. त्यावरुन शिवसेनेने मोदींना चिमटा काढला आहे
Narendra Modi
Narendra Modi

पुणे : बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होऊन आपण तुरुंगवासही भोगल्याची ऐतिहासिक माहिती मोदी यांनी दिली. मोदी सांगतात म्हणजे ते खरेच आहे हे मानायला हवे, अशी आजची स्थिती आहे. प. बंगालमधील निवडणुकांसाठी इतका खटाटोप करावा लागेल व प्रकरण बांगलादेशच्या (Bangladesh) स्वातंत्र्य लढय़ातील सहभागापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते. आम्हालाही मोदी यांच्या सांगण्यावर जनतेने विश्वास ठेवायलाच हवा आणि त्यांचा यथोचित गौरव व्हावा असे वाटते. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी (Narendra Modi) यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा," असा चिमटा शिवसेनेने (Shivsena) आपल्या 'सामना' या मुखपत्रातून काढला आहे. Shivsena Criticism on Narendra Modi over Bangladesh Tour

बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशमध्ये बोलताना केले होते.  20-22 वर्षांचे असताना आपण हा सत्याग्रह केल्याची माहिती मोदी यांनी दिली होती. त्यावरून सोशल मिडियावरुन (Socail Media) बराच गदारोळ झाला. त्यावरुन शिवसेनेने हा चिमटा काढला आहे. आपल्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायलाच हवा, असा चिमटा काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही काढला होता. आता त्यात शिवसेनेने उडी घेतली आहे. 

''पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे रण पेटले असताना मोदी शेजारीच असलेल्या बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. मागे उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका असतानाअसताना मोदी नेपाळ (Nepal) दौऱ्यावर गेले होते. तेथे पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दिवसभर पूजाअर्चा करीत होते, गाईला चारापाणी घालत होते. हे सर्व हिंदुस्थानातील वृत्तवाहिन्या सतत दाखवत होत्या. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र पश्चिम बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावे,'' असा आरोप या अग्रलेखात करण्यात आला आहे.

''पश्चिम बंगालातील विधानसभा निवडणुका भाजपने म्हणजेच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा (Amit Shah) यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘बांगलादेशी’ घुसले आहेत. त्या व्होट बँकेवर अनेक मतदारसंघांचे निकाल बदलणार आहेत. पश्चिम बंगाल व बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱ्यांची नातीगोती पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत,''असेही या अग्रलेखात सूचीत करण्यात आले आहे. Shivsena Criticism on Narendra Modi over Bangladesh Tour

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा (Goa) मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात, असाही चिमटा या अग्रलेखाद्वारे काढण्यात आला आहे.
Edited By  - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com