पहिल्या निवडणुकीचा बाजच वेगळा़! - Senior Citizen in Kolkata nostalgic about first Election | Politics Marathi News - Sarkarnama

पहिल्या निवडणुकीचा बाजच वेगळा़!

श्‍यामल रॉय
रविवार, 4 एप्रिल 2021

घोषालबाबूंचे वय सध्या ९६ वर्षे असून अद्यापही पहिल्या निवडणुकीची (Election) त्यांची स्मृती ठळक आहे.घोषाल यांनी पहिल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर जवळपास किमान दहा निवडणुकांमध्ये त्यांनी हीच जबाबदारी सांभाळली होती. १९ वर्षांचे असताना घोषाल यांनी दूरसंचार विभागात नोकरी सुरु केली होती. ३६ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. 

कोलकता  : ‘स्वतंत्र भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली. त्यावेळची निवडणूक वेगळीच होती आणि मला त्यात सहभागी होता आले याचा मला अभिमान आहे, असे सांगत कोलकत्यामधील (Kolkata) बेहल भागात राहणाऱ्या शैलेंद्रनाथ घोषाल जुन्या आठवणीत रमले. Senior Citizen in Kolkata nostalgic about first Election

घोषालबाबूंचे वय सध्या ९६ वर्षे असून अद्यापही पहिल्या निवडणुकीची (Election) त्यांची स्मृती ठळक आहे.घोषाल यांनी पहिल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर जवळपास किमान दहा निवडणुकांमध्ये त्यांनी हीच जबाबदारी सांभाळली होती. १९ वर्षांचे असताना घोषाल यांनी दूरसंचार विभागात नोकरी सुरु केली होती. ३६ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. 

‘‘अद्यापही दरवेळी मतदानाला जाताना मनात जुन्या आठवणी ताज्या होतात. स्वतंत्र भारतात स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून प्रथमच मतदान करण्याचा आनंद तर होताच, पण वयाच्या २८ वर्षीच एका स्वतंत्र देशाच्या पहिल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम केल्याचाही अभिमान आहे,’’ असे घोषालबाबू सांगतात. 

पहिल्या निवडणुकीवेळी एका शाळेतील मतदान केंद्राची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यावेळची परिस्थिती आतापेक्षा पूर्णपणे वेगळी होती, असे ते सांगतात. त्या काळात निवडणूक अधिकाऱ्याचा प्रवासाचा, जेवणाचा असा कोणताही खर्च सरकार करत नसे. हे काम म्हणजे त्यांच्या जबाबदारीचाच एक भाग असल्याचे सांगितले जाई. निवडणूक आयोग असा कोणताही विभाग अस्तित्वात नव्हता. Senior Citizen in Kolkata nostalgic about first Election

द्वेषपूर्ण प्रचार नव्हता
निवडणूक अधिकाऱ्याला (Election Officer) सुविधा पुरविण्याची कोणतीही जबाबदारी सरकारवर नसतानाच्या काळातील एक आठवण घोषालबाबू सांगतात. ‘‘एकदा मी निवडणूक केंद्रावर लवकर पोचण्यासाठी पहाटे सहा वाजताच घराबाहेर पडलो. इतक्या लवकर बाहेर पडल्याने जेवणाचा डबा घेऊन जाता आला नाही. मात्र, मतदान केंद्राजवळ राहणाऱ्या एका दयाळू वृद्ध महिलेने त्यांना स्वत: जेवण तयार करून दिले,’’ असे त्यांनी सांगितले. 

सध्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जसा बंदोबस्त असतो, तसे काहीही पहिल्या निवडणुकीवेळी नव्हते. कधी तरी एखाद दुसरा हवालदार (Police) उभा असे. मतदान ओळखपत्र नावाचा प्रकार नव्हता. त्यामुळे विविध पक्षांनी पुरविलेल्या चिठ्ठ्यांच्या आधारेच मतदान करून घेतले जाई. मतदान संपल्यावर मतदान पेट्या (Ballot Box) दूरसंचार भवनात जमा केले जात असत. येथेही इतर निवडणूक अधिकाऱ्यांची रांग असल्याने घरी पोचण्यासाठी काही वेळा मध्यरात्रही होत असे, असे ते सांगतात. प्रचारात आज प्रचंड प्रमाणात दिसणाऱ्याद्वेषाचा त्यावेळी मात्र पूर्णपणे अभाव होता, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. Senior Citizen in Kolkata nostalgic about first Election

निवडणूक अधिकाऱ्यांबाबत आदर
निवडणूक अधिकाऱ्यांबद्दल त्याकाळी बाबत जनतेमध्ये आदराची भावना होती, असेही घोषाल म्हणाले. बनावट मतदान, मतपेट्या पळवणे असे प्रकार दुर्मिळ होते. वादावादीही होत असे, मात्र हिंसाचार नव्हता, अशी आठवण त्यांनी सांगितली. निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकारही शक्यतो घडत नसत. त्यामुळे सध्या जे काही घडते आहे, ते पाहून मला दु:ख होते, अशी खंत व्यक्त करतानाच घोषालबाबूंनी ‘माझा अद्यापही जनतेवर विश्‍वास आहे,’असे सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख