आठवले म्हणाले....रिहाना , बंद करो तुम्हारा बहाना! - Ramdas Athavale Criticism on Rehana | Politics Marathi News - Sarkarnama

आठवले म्हणाले....रिहाना , बंद करो तुम्हारा बहाना!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना पाठमोरा देणारी हाॅलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना हिच्यावर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिका केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना पाठमोरा देणारी हाॅलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना हिच्यावर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिका केली आहे.

रिहाना , बंद करो तुम्हारा बहाना !आप को किसान आंदोलन में बोलना उचित नही है , यह पूर्णतयः राजनीतिक आन्दोलन हो चुका है ।किसानों के हित के लिए केन्द्र सरकार प्रतिबद्ध है, असे ट्वीट करुन आठवले यांनी रिहानावर टीका केली आहे.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसर्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेते यांनी या आंदोलनालाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. आता हाॅलिवूडची प्रसिद्ध गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय.  

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफाॅर्मर रिहानापर्यंतही पोहचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. 

रिहानाच्या या ट्वीटवरुन देशातले सेलिब्रिटी जागे झाले आहेत. रिहानाच्या विरोधात अनेक सेलिब्रेटी आता मैदानात उतरू लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतनंतर आता सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर हे क्रीडापटू सरकारच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. रिहानाच्या ट्विटनंतर कंगनानेही तिला ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणते, ''याविषयी कोणीच काही बोलणार नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहे. भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर चीन विभाजन झालेल्या भाग ताब्यात घेवून तिथे चायनीज कॉलनी उभारेल. तुमच्यासारखा आम्ही आमचा देश विकत नाही,'' असे कंगनाने म्हटले आहे. यावरच न थांबता कंगनाने एकामागोमाग एक ट्विटची मालिकाच सुरू केली आहे. रिहानावर अनेक वादग्रस्त आरोप तिने केले आहेत. खलिस्तानीशी संबंध असल्याचा आरोप करून त्यासोबत काही छायाचित्र टाकली आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख