हनुमान गढीतली साडेतीन क्विंटलची घंटा पंतप्रधान वाजवणार का? - Modi to Visit Hanuman Gadhi in Ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

हनुमान गढीतली साडेतीन क्विंटलची घंटा पंतप्रधान वाजवणार का?

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मजन्मभूमीकडे जाण्यापूर्वी पंतप्रधान हनुमान गढीत असलेली साडेतीन क्विंटलची घंटा वाजवून मग पुढील कार्यक्रमासाठी जातील, अशी अपेक्षा महंत प्रेमदासजी महाराज यांनी व्यक्त केली आहे.

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराच्या भूमीपुजनासाठी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य स्वागताची तयारी झाली आहे. आम्ही पंतप्रधानांचे फेटा, चांदीचा मुकूट व उपरणे देऊन पंतप्रधानांचा सत्कार करणार असल्याचे हनुमान गढीचे मुख्य महंत श्री गद्दीनशीन प्रेमदासजी महाराज यांनी सांगितले आहे. 

अयोध्येत आल्यावर पंतप्रधान सगळ्यात आधी हनुमान गढीत जाऊ श्री हनुमानाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील. रामजन्मभूमीकडे जाण्यापूर्वी पंतप्रधान हनुमान गढीत असलेली साडेतीन क्विंटल वजनाची घंटा वाजवून मग पुढील कार्यक्रमासाठी जातील, अशी अपेक्षा महंत प्रेमदासजी महाराज यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, योगगुरु रामदेव बाबा अयोध्येत पोहोचले आहेत. आजचा दिवस ऐतिहासिक असून तो कायम स्मरणात राहिल, राममंदिराच्या उभारणीमुळे देशात रामराज्य येईल, अशी प्रतिक्रिया रामदेवबाबांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही वेळापूर्वीच संपूर्ण कार्यक्रम स्थळाचे सॅनिटायझेशनही पूर्ण झाले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख