अहो, नक्की किती कोरोनामुक्त? हर्षवर्धन सांगतात ३५ लाख, सचिव म्हणतात ३९ लाख!

देशात ऑक्‍सीजनची अजिबात कमतरता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. महाराष्ट्रासह चारच राज्यांत प्रत्येकी ५० हजारहून जास्त रूग्ण आहेत व त्यातील सर्वाधिक २९ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण सांगितले. काल संपलेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ४०९ लोक दगावल्याचेही त्यांनी सांगितले.
How many people cured from Corona
How many people cured from Corona

नवी दिल्ली  : कोवीड १९ महामारीनावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्या ३५ लाख ४२ हजार ६६३ असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत सांगितले. मात्र त्यानंतर जेमतेम ५ तासांनी त्यांच्याच मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी हा आकडा ३९  लाख असल्याचे सांगितले. भारतात इतक्‍या कमी काळात ४ ते ५ लाख कोरोना रूग्ण खडखडीत होत असतील तर साऱ्या जगानेच हे 'इंडिया मॉडेल' अंगीकारायला हवे अशी चर्चा त्यामुळे रंगली.

दरम्यान देशात ऑक्‍सीजनची अजिबात कमतरता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. महाराष्ट्रासह चारच राज्यांत प्रत्येकी ५० हजारहून जास्त रूग्ण आहेत व त्यातील सर्वाधिक २९ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण सांगितले. काल संपलेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ४०९ लोक दगावल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून मागील एका आठवड्यात ७६ लाख चाचण्या करण्यात आल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. देशात सध्या ६९०० मेट्रीक टन ऑक्‍सीजनचे उत्पादन होत असून त्याची काहीही कमतरता नाही असे सांगून भूषण म्हणाले की ३८ लाख ५० हजारांहून जास्त लोक बरे झाले आहेत. देशाचा कोरोना सकारात्मकता दर (पॉजिटिविटी रेट) सुमारे ८.४  टक्के आहे.

हर्षवर्धन म्हणाले की देशातील रूग्णसंख्या ४५ लाख ६२ हजार ४१४ आहे. त्यातील ९२ टक्के लोकांना अगदी सौम्य लक्षणे आहेत. केवळ ५.८ टक्के लोकांनाच ऑक्‍सीजन उपचारांची गरज लागली असून केवळ १.७ टक्के रूग्ण अतिदक्षता विभागात आहेत. मृतांची संख्या ७६२२१ आहे. केंद्राने वेळेवर लॉकडाऊन लावल्यामुळे अंदाजे १४ ते २९ लाख रूग्णसंख्या कमी झाली व तब्बल ३८ हजार लोकांचे जीव वाचविता आले. आतापावेतो एकूण रूग्णांच्या ७७.६५ टक्के म्हणजे ३५,४२,६६३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मुख्यत: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, तेलंगाना, ओडिशा, असम, केरल और गुजरातमधूनच सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.

सध्या १८ राज्यांत कोरोना रूग्णांची संख्या ५ ते  ५०हजार आहे. त्यातील केवळ चार राज्यांत ५० हजारांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. देशात चाचण्यांची संख्या वाढत असल्याचे सांगताना डॉ. भार्गव म्हणाले की भारतात तीन लसींच्या क्‍लिनीकल चाचण्या सुरू आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या दोन चाचण्या पूर्ण झाल्या असून आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर या संस्थेतर्फे १४ ठिकाणी १५०० रूग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होतील. प्लाझ्मा उपचार १०० वर्षांपासून जास्त वर्षांपासून सुरू आहेत. कोरोनावर याचे उपचार करता येतात की नाही याचा अभ्यास सुरू आहे.

या ४ राज्यांत ६० टक्के रूग्ण (टक्केवारी)
महाराष्ट्र २९
आंध्र प्रदेश
कर्नाटक १०
उत्तर प्रदेश ६.८
तमिळनाडू ४.७
९ ते १५ सप्टेंबरपर्यंत झालेले मृत्यू
महाराष्ट्र ४०९
कर्नाटक १२१
उत्तर प्रदेश ७३
आंध्र प्रदेश ६९
तमिळनाडू ७२


Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com