..राहुल गांधी क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यासारखे - बराक ओबामा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे व्यक्तीमत्त्व चिंतेने भरलेले असल्याचे वर्णन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांनी आपल्या 'ए प्राॅमिस्ड लँड' या आत्मचरित्रात केले आहे. आपल्या या आत्मचरित्रात ओबामा यांनी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्याही स्वभावाचे वर्णन केले आहे.
Rahul Gandhi - Barak Obama
Rahul Gandhi - Barak Obama

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे व्यक्तीमत्त्व चिंतेने भरलेले असल्याचे वर्णन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांनी आपल्या 'ए प्राॅमिस्ड लँड' या आत्मचरित्रात केले आहे. आपल्या या आत्मचरित्रात ओबामा यांनी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्याही स्वभावाचे वर्णन केले आहे. 

या आत्मचरित्राचा काही अंश अमेरिकेच्या काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी हे वर्णन केले आहे. ''आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन शिक्षकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणारा पण आपल्या विषयात प्राविण्य मिळविण्याची क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यासारखे राहुल यांचे व्यक्तिमत्त्व आहे,'' असेही ओबामा या पुस्तकात म्हणतात.

सोनियांचाही उल्लेख
ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख केला आहे. त्या हँडसम असल्याचे मत ओबामा यांनी नोंदवले आहे. ''आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रेहेन एमॅन्यूल यांच्यासारखे पुरुष हँडसम असल्याचे सांगितले जाते. पण महिलांबद्दल बोलले जात नाही. याला सोनिया गांधी यांच्यासह एक दोन अपवाद असतील,'' असे ओबामा या आत्मचरित्रात म्हणतात. ओबामा यांनी अमेरिकेचा माजी संरक्षण मंत्री बाॅब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Dr. Manmohansingh) यांची तारीफ या आत्मचरित्रात केली आहे. दोघांमध्ये भावशून्य प्रामाणिकपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओबामांचे हे आत्मचरित्र १७ नोव्हेंबरला बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com