सात उपायुक्तांच्या पुण्यात बदल्या - Police Officer Transfers Sanjay Shintre Appointed Additional Commissioner in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

सात उपायुक्तांच्या पुण्यात बदल्या

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची यादी रात्री उशिरा जारी केली आहे़ त्यात पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये ७ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

पुणे : पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची यादी रात्री उशिरा जारी केली आहे़ त्यात पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये ७ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

राहुल श्रीरामे अपर नियंत्रक, नागरी सरंक्षण आणि होमगार्ड, मुंबई यांची पुण्यात उपायुक्त परिमंडळ ४ पदी बदली झाली आहे.  

अन्य बदल्या पुढील प्रमाणे (कंसात पूर्वीचे नेमणुकीचे ठिकाण)...
सागर पाटील (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर) उपायुक्त परिमंडळ २, 
निलेश आष्टेकर (पोलीस अधीक्षक, सीआयडी) उपायुक्त - पी एम आर डी ए़ पुणे 
आनंद भोईटे (पोलीस अकादमी, नाशिक) उपायुक्त -पिंपरी, 
नम्रता पाटील (उपायुक्त, गुप्तवार्ता) उपायुक्त परिमंडळ ५, 
सदानंद वायसे पाटील (नागरी सरंक्षण, मुंबई) अधीक्षक, लोहमार्ग,पुणे 

पुणे शहरातील उपायुक्त प्रसाद अक्कानारु, सारंग आव्हाड, शिरीष सरदेशपांडे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या नव्या नेमणुकींचे नस्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे़  जात पडताळणी समिती, बुलढाणा येथील उपअधीक्षक सुनिल पवार यांची पुण्यात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख