माझ्यासारख्या नवख्या मुख्यमंत्र्याला चव्हाणांसारख्या अनुभवी आमदाराची साथ 

निवडणूक आली की तुमच्याकडे मते मागायला येणारे नव्हे; तर एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे.
 Uddhav Thackeray interacted online for activists for Satish Chavan's campaign
Uddhav Thackeray interacted online for activists for Satish Chavan's campaign

औरंगाबाद : निवडणूक आली की तुमच्याकडे मते मागायला येणारे नव्हे; तर एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे प्रश्न सोडवण्याचे नक्कीच प्रामाणिक प्रयत्न केले जातील पदवीधरांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी पुन्हा सतीश चव्हाण यांचा विजय महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच तीनही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 22 नोव्हेंबर) झुम मिटिंगच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला कोणताही अनुभव नसताना मी मुख्यमंत्री पदावर बसलो. माझ्यासारख्या नवख्या मुख्यमंत्र्याला मात्र सतीश चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी आमदारांची साथ लाभलेली आहे. सतीश चव्हाण हे सभागृहात सातत्याने पदवीधरांचे प्रश्न मांडत आले. असा सच्चा कार्यकर्ता पुन्हा पदवीधरांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी हवा आहे. त्यांचा विजय हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय असून एकेकाळी आपण राजकीय विरोधक जरी असलो तरी आपण एकत्र आलो आहोत. सर्वांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी काम करायचे आहे. 

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या सावटातदेखील जवळपास 35 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाची मोठी संधी मिळणार आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांचा जीवनात समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करीत आहे. त्यासाठी सतीश चव्हाण यांचा विजय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

उद्योग लवकरात लवकर कसे उभे राहतील, त्यातून नवीन तरुण पदवीधरांच्या हाताला काम कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केवळ निवडणूक आली की तुमच्याकडे मते मागायला येणारे नव्हे; तर एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याचा निश्‍चितच प्रामाणिक प्रयत्न केले जातील. पदवीधरांचे काही प्रश्न सुटले तर काही अजून शिल्लक आहेत. अजून चार वर्ष आहेत, त्यापुढची अनेक वर्ष आपल्याला काम करण्याची संधी आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेकडून तीन ठिकाणी सुविधा 

औरंगाबादमध्ये मध्य विधानसभा मतदार संघासाठी तापडीया नाट्यमंदिर, पूर्व मतदार संघासाठी हॉटेल विंडसर व पश्‍चिम विधानसभा मतदार संघासाठी हॉटेल विट्‌स येथे हे ऑनलाईन प्रचार ऐकण्याची शिवसेनेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com