मराठा आरक्षण गमावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

सरकारने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला आहे.
Those who lose the reservation of Maratha community should not teach us : Ashish Shelar
Those who lose the reservation of Maratha community should not teach us : Ashish Shelar

बीड  : ज्या पद्धतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची पूर्व व पूर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असतो अन॒ खरा चेहरा दिसत नाही, त्याच पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आताच्या शिवसेनेच्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. (Those who lose the reservation of Maratha community should not teach us : Ashish Shelar)

मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या स्थितीबाबत शेलार यांनी बुधवारी (ता. २ मे) पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, राजेंद्र मस्के उपस्थित होते. अॅड. शेलार म्हणाले, कालेलकर आयोगाने मराठा समाजाचा हिताचा विचार केला. पण, तो अहवाल तत्कालीन सरकारने टेबलच केला नाही. मंडल आयोगाच्या वेळी आलेली संधी सोडली. बापट आयोगाने समाजाला आरक्षण नाकारले. पण, तो अहवालही सरकारने नाकारला नाही. वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या, त्या शिफारशी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समितीऐवजी आयोगाची गरज असतानाही सरकारने आयोग नेमला नाही.

अशा प्रकारे एक-एक करत मराठा समाजाच्या हिताचा खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकारमधील पक्षांनी केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.
हीच लोकं भाजपाला शिकवित आहेत. आम्हाला शिकवू नका, नाकाने कांदे सोलू नका, मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, असेही ते म्हणाले.

गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून अहवाल दिला. तो अहवाल संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने मांडला नाही. अन्यथा समाजाला मिळालेले फायदे टीकले असते, म्हणून मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण हवे आहे, त्यासाठी मराठा समाजाच्या आक्रोशाला भाजपचा झेंडा बाजूला ठेवून साथ देत आहे. सरकारने मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात, तसेच अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख लावू नका, अशा मागण्याही त्यांनी केला. 

‘ईडब्ल्यूएस’मध्ये मराठा समाजाला आरक्षण आरक्षण देण्यात तुमचे कर्तृत्व काय? असा सवाल करत आजपर्यंत मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती. आता कर्तृत्वशून्यताही दिसली. ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचेही मोठे नुकसान केले आहे, असा आरोपही शेलार यांनी केला.

त्या शेतकऱ्याची शेलारांनी घेतली भेट

दरम्यान, किनगाव (ता. गेवराई) येथे बियाणे खरेदीसाठी गेलेल्या मोतीराम चाळक या शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केली होती. त्या शेतकऱ्यांची आशिष शेलार यांनी आज भेट घेतली. वाळूमाफियांना पायघड्या घालणारे सरकार शेतकऱ्यांवर काठ्या उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार पवार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे या वेळी उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com