'वैद्यनाथ'ची साखर पाहून पंकजा मुंडे सद्गदित झाल्या

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा आशिया खंडात लौकिक होता. मात्र, दुष्काळामुळे ऊस उत्पादनातील घट आणि इतर कारणांनी मधल्या काळात कारखान्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.
Vaidyanath, Pankaja Munde,
Vaidyanath, Pankaja Munde,

बीड : ऊस गाळप, साखरेचा उतारा, ऊसाला भाव असे अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मागच्या काळात निसर्गाच्या अवकृपेने अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र, अठरा महिन्याच्या खंडानंतर पुन्हा वैद्यनाथचा पट्टा जोमाने फिरु लागला आहे. शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे कारखान्यात गेल्या आणि कारखान्यात उत्पादित झालेली साखर पाहून सद्गदित झाल्या. त्यांनी कारखान्यात गाळप झालेली तीनही प्रकारची साखर हाती घेतली आणि आनंदाने सहकाऱ्यां भरवली. 

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे राजकारण हे ऊसतोड मजूरांचा नेता आणि पाठीराखा म्हणून उभारलेले. ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मोठ्या ताकदीने दोन हात करत. ऊस उत्पादकांसाठी त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा आशिया खंडात लौकिक निर्माण झाला आणि अनेक पुरस्कारांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाचे दालन भरुन गेले. 

दरम्यान, त्यांच्या पश्चात कारखान्याची धुरा त्यांच्या कन्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर आली. मात्र, मागच्या काही वर्षांत जिल्ह्यात आणि मराठवाड्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ असे दुष्टचक्र सुरु झाले. ऊसाऐवजी कारखान्याचे गाळप वारंवार बंद राहील्याने कारखान्याचे अर्थचक्रही थांबले. परिणामी कारखान्याला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. 

या पाठीमागे व्यवस्थापनातील दोष आणि स्थानिक राजकारण देखील असल्याचे नाकारता येणार नाही. यंदाच्या हंगामात कारखान्यासमोर अनेक संकटे होती. कारखान्यावर असलेल्या कर्जामुळे चालू हंगामात कारखाना चालविण्यासाठी पैशांची गरज होती. मात्र, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप प्रणित साखर कारखान्यांच्या कर्जांनाही शासनाची कर्ज थकहमी दिली. 

पंकजा मुंडे यांचे पवार व ठाकरे यांच्याशी असलेले ऋणानुबंधही यावेळी कामाला आले. त्यामुळे कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटला आणि मागचे १८ महिने बंद असलेला कारखाना तारेवरची कसरत करत पुन्हा सुरु झाला. मागच्या १९ दिवसांत गुरुवार पर्यंत कारखान्याने शेतकऱ्यांचा ६२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन ४८ हजार साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. दररोज ३ हजार ५०० मेट्रिक टन ऊस गाळप करत असलेला वैद्यनाथ येत्या दोनच दिवसांत चार हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार आहे. 

दरम्यान, परळी दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कारखान्याला भेट दिली आणि आढावा घेतला. यावेळी कारखान्याने उत्पादित केलेली तीन प्रकारची साखर पाहून त्या सद्गदित झाल्या. आनंदाच्या भरात त्यांनी हातात मुठभर साखर घेत उपस्थित अधिकारी, कर्मचारी व संचालकांना साखर भरवली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com