Second time corona positive MP Chikhlikar to be treated in Mumbai | Sarkarnama

दुसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह खासदार चिखलीकरांवर मुंबईत उपचार : प्रकृती ठणठणीत

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

दिल्लीत सुरु झालेल्या संसदच्या अधिवेशनप्रसंगी दोन्ही सभागृहांचे किमान २५ खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत.  

नांदेड : नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दिल्लीमध्ये अहवाल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मुंबईला आले आहेत. आता त्यांच्यावर मुंबईत उपचार होणार असून बुधवारी (ता. १६) ते रुग्णालयात दाखल होणार आहेत.

दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. १४) सुरु झाले. अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. दरम्यान, या चाचणीमध्ये २५ खासदार पॉझिटिव्ह आले असून, त्यामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले होते. महाराष्ट्रातील चिखलीकर आणि बुलढाण्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खासदार जाधव यांना तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार चिखलीकर हे उपचारासाठी मुंबईला आले असून ते उद्या बुधवारी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी  दिली.

आॅगस्टमध्ये चिखलीकर होते पॉझिटिव्ह
चिखलीकर हे सात आॅगस्ट रोजी कोरोनाबाधित झाले होते. पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि त्यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली होती. पुत्रावर औरंगाबादेत उपचार सुरु असल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरही औरंगाबादेतच क्वारंटाईन झाले होते. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिला असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे औरंगाबादेत क्वारंटाइन असताना त्यांनी स्वॅब तपासण्यासाठी दिला होता. उपचार घेऊन ते १८ आॅगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र, दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनाला गेल्यानंतर त्यांचा अहवाल सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

अहवाल मिळाला नव्हता
दिल्लीत सुरु झालेल्या संसदच्या अधिवेशनप्रसंगी दोन्ही सभागृहांचे किमान २५ खासदार कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती दुपारी सर्वत्र पसरली होती. त्यात खासदार चिखलीकर, बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव हे दोघे पॉझिटिव्ह आल्याचे ‘एनएनआय’च्या वृत्तात म्हटले होते. याबाबत खासदार चिखलीकर यांना विचारले असता, ‘ऑगस्टमध्ये माझा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी उपचार घेऊन नांदेडला परतलो, दक्षता घेऊन कामास लागलो. तीन दिवसांपूर्वीच दिल्लीला आलो आहे. तेथे काल कोरोना चाचणी झाली, मात्र त्याचा अहवाल मला अद्याप मिळालेला नाही. स्वीय्य सहायकासही तो मिळालेला नाही’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आपण मुंबईला उपचारासाठी आलो असल्याची माहिती त्यांनी मंगळवारी (ता. १५) दिली.

माझी प्रकृती ठणठणीत - चिखलीकर
खासदार चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास कळाली. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी त्यांची विचारपूस केली. मी दिल्लीत पुन्हा पॉझिटिव्ह झाल्याची बातमी रात्री आठच्या सुमारास कळाली. अनेकांकडून माझ्या तब्येतीची विचारपूस केली. माझी प्रकृती ठणठणीत असून, माझी काळजी करू नका, असे सांगितल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख