राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन 

वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.
Rashtrasant dr. Shivling Shivacharya Maharaj passes Away
Rashtrasant dr. Shivling Shivacharya Maharaj passes Away

नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे मंगळवारी (ता. 1 सप्टेंबर) सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 104 वर्षांचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांना न्यूमोनिया झाला असल्याने त्यांच्या प्रकृतीने वैद्यकीय उपचाराला साथ दिली नाही. त्यांना सोमवारी (ता. 31 ऑगस्ट) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

सुमारे चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत, अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते. त्यातच आज (मंगळवारी) त्यांचे निधन झाले. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी 1945 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत. 

वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांनी दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com