निवडून आल्यावर सहा वर्षांनी भेटणारे आमदार काय कामाचे? : प्रा. ढवळेंची चव्हाणांवर टीका 

आमदार हा पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवणारा असावा, तो केवळ गुत्तेदारी करण्यासाठी आमदारकी वापरणारा नसावा.
Pvt. Sachin Dhawale criticizes MLA Satish Chavan
Pvt. Sachin Dhawale criticizes MLA Satish Chavan

पुणे : "औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या बारा वर्षांत पदवीधरांचे कुठलेही प्रश्न सोडवले नसून सुज्ञ पदवीधर मतदाराने त्यांना आता घरी बसवले पाहिजे,' अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी केली. 

आमदार हा पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवणारा असावा, तो केवळ गुत्तेदारी करण्यासाठी आमदारकी वापरणारा नसावा असा टोला प्रा. ढवळे यांनी लगावला आहे. निवडून दिल्यानंतर थेट सहा वर्षांनी तोंड दाखवणारे आमदार काय कामाचे, असेही प्रा. ढवळे यांनी म्हटले आहे. 

प्रचाराची रणधुमाळी उद्या (ता. 29 नोव्हेंबर) संपणार आहे. औरंगाबाद पदवीधरसाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात असून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांची तरुणाईत क्रेझ पहायला मिळत आहे. त्यांच्या अनेक सभा, रॅली व मेळाव्याला प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. एकूण मतदारांमध्ये तरूण आणि पहिल्या वेळी मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक असल्याने ढवळे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. 

विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या बारा वर्षांत पदवीधरांचे कुठलेही प्रश्न सोडवले नसून सुज्ञ पदवीधर मतदाराने त्यांना आता घरी बसवले पाहिजे. पदवीधर आमदार हा पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवणारा असावा, तो केवळ गुत्तेदारी करण्यासाठी आमदारकी वापरणारा नसावा, असे प्रा. ढवळे यांनी म्हटले आहे. 

सतीश चव्हाण हे निवडून आल्यावर पुन्हा थेट सहा वर्षानीच पदवीधरांच्या दर्शनाला येतात. गेल्या बारा वर्षांत त्यांनी पदवीधरांचे कुठले प्रश्न सभागृहात विचारले? किती पदवीधरांच्या कोणत्या समस्या सोडवल्या? याचा हिशेब त्यांनी मतदारांना द्यावा, असे ढवळे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com