प्रा. सचिन ढवळे ठरणार जायंट किलर : समर्थकांचा दावा 

ढवळे हा नवा चेहरा असून राजकारणी नाही.
Pvt. Sachin Dhawale to be Giant Killer: Supporters claim
Pvt. Sachin Dhawale to be Giant Killer: Supporters claim

पुणे : कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना प्रा. सचिन ढवळे यांना प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा विश्‍वास दाखवला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रा. ढवळे चांगलेच लोकप्रिय आहेत. राज्यभरातून पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आलेले विद्यार्थी हीच या निवडणुकीतील त्यांची खरी ताकद आहे. संपूर्ण मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यातील सर्व विद्यार्थी एकमुखाने पाठीशी उभे राहिल्यास माझा विजय निश्‍चित आहे, असा प्रा. ढवळे यांचा दावा आहे. 

प्रा. ढवळे यांनी 2015 पासून आजपर्यंत "एमपीएससी' तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना "ढवळेज मॅथ अँड रीजनिंग ऍकॅडमी तसेच पुण्यातील इतर नामवंत ऍकॅडमीच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले आहे. पुण्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका मोफत दिलेली आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यात अडकून पडलेल्या 20 ते 25 हजार मुलांना मोफत जेवण व त्यांना घरी पोचवण्याची व्यवस्था ढवळे यांनी केली आहे. त्यामुळे प्रा. ढवळे यांच्या संपर्कातील नवीन पदवीधरांच्या मनात त्यांच्याविषयी आत्मियता आहे. 

प्रा. ढवळे यांनी त्यांच्या ऍकॅडमी मार्फत अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिल्यामुळे तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक मतदार आहे. हा नवीन नोंदणी केलेला मतदार जवळपास अडीच ते तीन लाखांच्या दरम्यान आहे. ज्यांची नोंदणी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रा. ढवळे यांनी केलेली आहे. त्यामुळे अडीच लाख मते ढवळे यांच्या हक्काची आहेत. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याने राज्यमंत्री कडू यांना मानणारा वर्ग सचिन ढवळे यांना निवडून देण्यास मदत करणार आहे. 

ढवळे हा नवा चेहरा असून राजकारणी नाही. प्रा. ढवळे यांनी दिलेल्या जाहीरनाम्यातील पन्नास मुद्द्यांपैकी जवळपास तीस ते पस्तीस मुद्दे प्रा. ढवळे यांनी याअगोदरच हाताळलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जाहीरनामा मतदारांना खराखुरा वाटतो. इतर उमेदवारांचा जाहीरनामा फेकाफेकी असल्याचे त्यांचं म्हणणं आहे. 

आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या बारा वर्षांत एकही काम पदवीधरांसाठी, शिक्षकांसाठी तसेच ज्या विभागातून ते निवडून आलेत, त्या विभागातील लोकांसाठी केलेले दिसून येत नाही. त्यांना राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा, धनशक्ती असली, तरी पक्षांमध्ये अंतर्गत हेवेदाव्यांचा फटका त्यांना बसू शकतो.

भाजपने रमेश पोकळे यांना डावलून बोराळकर यांना तिकीट दिल्याने बंडखोर पोकळे भाजपची तसेच मराठा समाजाची मते खाणार आहेत. सिद्धेश्वर मुंडे या नवख्या चेहऱ्यानेही त्यांच्या ताकदीनुसार सर्वत्र चर्चा घडवून आणली आहे. सर्वच पक्षांत फाटाफूट असल्यामुळे आणि प्रा. ढवळे यांची बाजू भक्कम असल्यामुळे त्यांच्या विजयाचा विश्‍वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com