आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण - Nanded MLA Balaji Kalyankar Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नांदेड : नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.  कल्याणकर यांची दोन दिवसांपूर्वी अॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती, काल आरटीपीसीआर टेस्ट पाँझिटीव्ह आली आहे. 

आमदार कल्याणकरांची प्रकृती चांगली असून, गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.  आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन आमदार कल्याणकर यांनी केलं आहे.  कल्याणकर यांनी गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

 नांदेड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच वयाच्या 55 व्या वर्षी  हैदराबाद येथे उपचारा दरम्यान नुकतेच निधन झाले. सुरवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले प्रकाश कौडगे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम केले  होते.त्यांचा जिल्हाप्रमुख म्हणून आदरपूर्वक दरारा होता. कौडगे यांनी सहसंपर्क म्हणून ही काम पाहिले मध्यंतरी त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्ष झाले. लिंगायत समाजासाठी त्यांनी भरपूर काम केले. कौडगे हे काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.  

हेही वाचा  : दिलीप बाठे यांचे कोरोनामुळे निधन  

भोर : तालुक्याच्या राजकारणातील मुलूख मैदानी तोफ आणि राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळख असलेले दिलीप नामदेव बाठे (वय ६१) यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेले १४ दिवस ते व्हेंटीलेटरवर होते. त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहीत मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. भोर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य रोहन बाठे यांचे ते वडील होत. ता. २८ मार्चला त्यांची  कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. दिलीप बाठे हे जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष, शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे मुख्य समन्वयक, गुंजवणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक आणि कापूरव्होळ (ता. भोर) येथील अमृता उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून कार्यरत होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख