'वो करे तो लीला…हम करे तो…जुर्म! वाह मोदीजी!' - MP Imtiaz Jalil criticizes Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

'वो करे तो लीला…हम करे तो…जुर्म! वाह मोदीजी!'

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

औरंगाबाद : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. 

मात्र, अशा परिस्थितीत यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. नुकतेच हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

बाबरी प्रकरणी अडवानींसह ३२ जणांची मुक्तता करणारे न्यायाधीश निवृत्तीनंतर बनले लोकायुक्त 

या संदर्भात जलील यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ''वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!'' असा टोला जलील यांनी मोदींना लगावला आहे. सोबत कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

तसेच, ''जर माझ्या शेजारचे छोटे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला जात असेल तर विमानतळांवरील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे का सुरू आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. नुकतीच मुंबई विमानतळावर ग्राहकांसह सर्व दुकाने सुरू असल्याचे पाहिले!'' असल्याचे देखील जलील यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

राज्यातील संभाव्य लॉकडाउनबाबात देखील जलील यांनी टीका केली होती. हे नेते गरिबांच्या हिताचा निर्णय घेणार नाहीत, त्यामुळे आता गरिबांनाच स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल, लढावे लागेल. असे जलील म्हणाले होते. त्यांनी औरंगाबादमधील लॉकडाउनच्या निर्णयाला देखील विरोध दर्शवला होता.

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडू नका
 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून आज रात्री याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कडक लॅाकडाऊन जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार, याबाबतही उत्सुकता लागली आहे. 

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीचे विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सशी संवाद साधत लॅाकडाऊनबाबत मते जाणून घेतली. बहुतेक सदस्यांनी लॅाकडाऊनला पाठिंबा दिल्याचे समजते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॅाकडाऊनचा आग्रह धरला. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख