शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी यांचे निधन

आर. एम. वाणीयांनी विधानसभेत सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मांडले होते.
Sarkarnama (48).jpg
Sarkarnama (48).jpg

वैजापूर (औरंगाबाद) : शिवसेनेचे नेते आणि वैजापूरचे माजी आमदार आर.एम. वाणी याचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.  वाणी यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी वाणी यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली.

वाणी यांचे पार्थिव आज सकाळी अंत्यदर्शनासाठी येवला रोडवरील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अभ्यासू पत्रकार, संपादक, नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर. एम. वाणी (R. M. Vani) यांनी विधानसभेत सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मांडले होते.  

औरंगाबाद जिल्ह्यात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या आमदारांपैकी वाणी हे एक आमदार होते. शिवसेनेचा गड असलेल्या वैजापूर तालुक्यात गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहुन आमदारकीचा तिकिट नाकारलं होतं.

कार्यकर्ते आणि अनेक नेते त्यांची दोन दिवस समज काढत होते, पण आता इतरांना संधी मिळावी असं म्हणत त्यांनी उमेदवारी नको म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना कळवलं होते.  वैजापुरचे नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार असा त्यांचा राजकीय जीवन प्रवास होता.
 
सरकारनं वेळेत मानधन न दिल्याने वसतिगृह अधीक्षकांची आत्महत्या
लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील हेलंब या गावी समाज कल्याण विभागाअंतर्गत नागाबुवा मागासवर्गीय वसतिगृह असून इथं चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील 35 वर्षीय भरत किसन राजुरे हे गेल्या 20 वर्षांपासून वसतिगृह अधीक्षक पदावर नोकरी करत होते. सरकारने वेळत मानधन न दिल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. ''सरकारनं वेळेवर मानधन दिल असतं तर जीवन संपवण्याची वेळ मुलावर आली नसती,'' असे त्याचे वडील किसन राजुरे याच म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com