माजी मंत्र्याचा कोरोनामुक्तीसाठी पुढाकार...

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील पाच लाख लोकांना आर्सेनिक अल्बम या औषधींचे वितरण सुरु केले आहे.
jaydatt7-
jaydatt7-

बीड : लॉकडाउनच्या काळात मजूर, शेतकरी, हातावर पोट असणाऱ्यांना किराणा साहित्याची वाटप केल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील पाच
लाख लोकांना आर्सेनिक अल्बम या औषधींचे वितरण सुरु केले आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथी औषध गुणकारी ठरत आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने तशी शिफारस केली आहे. 

काकू नाना प्रतिष्ठान व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक महाविद्यालयातर्फे पाच लाख नागरिकांना मोफत डोस देण्याचा प्रारंभ शनिवारी जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पत्रकार, वकील, डॉक्टरांना देऊन करण्यात आला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर,  अॅड. कालिदास थिगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, डॉ. योगेश क्षीरसागर, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप गोरे, अ‍ॅड. श्रीराम लाखे, अ‍ॅड. दिनेश हंगे, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, सदस्य गणपत डोईफोडे, सुधाकर मिसाळ, वैजिनाथ तांदळे, विजय सरवदे उपस्थित हेाते. 

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, "संकटाच्या काळात आपण जनतेला मदत करणे ही संस्कृती आहे. कोरोनाच्या संकटाने बरच काही शिकवले. कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
बीड मध्ये होमिओपॅथी औषध वाटप होत आहे. आज बीड जिल्हा कोरोनापासून दूर आहे, भविष्यात ही कोरोनापासून जिल्हा दूरच रहावा, यासाठी होमिओपॅथीचे औषध वाटप करत आहोत. कोरोनाने सगळे जगच हलवले आहे. या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे व या महामारीला टाळण्यासाठी उपाययोजना करणे हे महत्वाचे आहे." 

सजग व सावध व्हा..

आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम याऔषधाचा चांगला परिणाम दिसून आल्यामुळे सर्वसामान्यमाणसापर्यंत हे औषध मोफत देण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक घरासाठी हे औषध वाटप करण्यात येणार आहे. आपला माणूस निरोगी राहावा, सदृढ राहावा, ही या मागची भावना आहे. बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये कसा येईल, यासाठी काळजी घेणे हेच महत्वाचे आहे. संपूर्ण विश्वाला व्यापून टाकेल, असा हा भयानक रोग आहे. याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने खंबीरपणे दक्षता घेणे गरजेचे आहे. सजग व सावध राहून याचा मुकाबला करता येतो, असेही  क्षीरसागर म्हणाले. प्रास्ताविक माजी प्राचार्य डॉ. अरूण भस्मे यांनी केले. सूत्रसंचलन प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांनी केले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com