Eknath Khadse's entry strengthens NCP: Dhananjay Munde
Eknath Khadse's entry strengthens NCP: Dhananjay Munde

एकनाथ खडसेंचा प्रवेश राष्ट्रवादीला बळकटी देणारा : धनंजय मुंडे 

माझे वडील दिवंगत पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मरणदिनानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू आहे, त्यामुळे आपण परळीत आहोत. अन्यथा, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्वागताला उपस्थित राहिलो असतो, असे धनंजय मुंडे यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर सांगितले.

बीड : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशामुळे मी आनंदी असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षातील माझ्या सारख्या तरुणांना फायदा होईल, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत आयुष्यातील मोठा काळ घालवत पक्षाला बळ दिले. अनेक आमदार - खासदार निवडून आणले. त्यांनी पक्ष संघटन वाढवले. परंतु, त्यांच्या सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. 

भाजपने त्यांच्याबाबत केलेला प्रकार अजिबात योग्य नव्हता. सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असताना मी देखील त्यांच्यासोबत काम केलेले आहे. सुमारे 40 वर्षांपेक्षा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द असलेल्या एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाने पक्षाला नक्कीच बळ मिळेल, असा आशावादही मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.

त्यांच्या प्रवेशामुळे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, वडिल दिवंगत पंडितअण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहानिमित्त आपण परळीत आहोत; अन्यथा नाथाभाऊंच्या स्वागताला आपण नक्कीच आनंदाने हजर राहिलो असतो, असेही मुंडे म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाने भाजपचा खानदेशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com