आम्ही शब्दाला जागणारे लोक; मुंडेंनी पुन्हा करून दिली आठवण!

परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना आज सुरुवात झाली. परळी- अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे. मतदारसंघात दळणवळणाच्या सोयीसह इतरही विकासकामे जलदगतीने पूर्ण करू असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
Dhannajay Munde
Dhannajay Munde

परळी : परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना आज सुरुवात झाली. (Parli city bypass road work foundation stone ceremony) परळी- अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. (other roads repairing work also complete soon) परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे. मतदारसंघात दळणवळणाच्या सोयीसह इतरही विकासकामे जलदगतीने पूर्ण करू असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay munde) यांनी केले. 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या चौपदरीकरण, डांबरीकरण व परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे श्री. मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. 
विरोधकांना सल्ला 

परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये, उलट आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक सल्लाही धनंजय मुंडे यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला.  

विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला येत्या पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल इतका विकास करून दाखवू, या धनंजय मुंडे यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत 'आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक आहोत', असे ते म्हणाले. 

या दोन्ही भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हलगे, जिल्हा पिरषद गटनेते अजय मुंडे, नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपकनाना देशमुख, शिवाजी सिरसाट, पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. गोविंदराव फड, सौ. संगीताताई तुपसागर, प्रा. मधुकर आघाव, सुरेश अण्णा टाक, भाऊसाहेब कराड, चेतन सौंदळे, रवींद्र परदेशी, समद भाई, वैजनाथ सोळंके, दत्ता आबा पाटील, संजय आघाव, माणिकराव फड, गोविंद बबनराव फड, कांताभाऊ फड, तुळशीराम पवार रणजित लोमटे, विलास बिडगर, माऊली मुंडे, गोविंद मुंडे, बंडू गित्ते, सौ. प्रियांका ताई रोडे, शंकर कापसे, सौ. अर्चनाताई दौंड, यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यांसह मान्यवर उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com