वाळूच्या गाडीसाठी लाच घेणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला पोलिस कोठडी..  - Deputy Collector Shrikant Gaikwad arrested for taking bribe for sand | Politics Marathi News - Sarkarnama

वाळूच्या गाडीसाठी लाच घेणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला पोलिस कोठडी.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

लाचखोर बीडीओसह एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यानं भष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बीड : माजलगावमध्ये वाळूच्या गाडीसाठी लाच घेणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यासह चालकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीकांत गायकवाड असे या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. श्रीकांत गायकवाड हे माजलगावला उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत होते. 

यादरम्यान तब्बल 65 हजारांची लाच घेताना चालकासह गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दोन दिवसात लाचखोर बीडीओसह एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यानं भष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर...
 
हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर शिवसेनेचे नेते तथा वन मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते,  आमदार संतोष बांगर हे देखील पुढे आले आहेत, मंत्री राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. 

"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. त्यांना चैाकशी वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितले. पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी कुठलाही आरोप केला नाही. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावात येऊ नये आणि कुठलाही निर्णय घेऊ नये. तसेच संजय राठोड यांनी याठिकाणी आपल्या कुटुंबासह येऊन येथील विकास कामांचा आढावा घ्यावा. धर्मपिठाधीश्‍वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थान ट्रस्टी अध्यक्ष कबिरदास महाराज, सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या सर्व संत महंतांनी चर्चा केली. यानंतर जितेंद्र महाराज आणि कबिरदास महाराज यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या संदर्भात भाविकांना काही महत्वाच्या सूचना द्यायच्या होत्या, त्याबाबत आम्ही चर्चा केली.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख