सत्तेच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविले जात आहेत : पंकजांचा धनंजय मुंडेंवर आरोप 

सध्या संस्थांना टार्गेट केले जात आहे. मात्र, सामान्य लोकांना हे आवडत नसते.
Crimes are being registered against our activists through power: Pankaj's allegations against Dhananjay Munde
Crimes are being registered against our activists through power: Pankaj's allegations against Dhananjay Munde

बीड : "सत्तेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्या कार्यकर्त्यांवर ट्रॅप, गुन्हे नोंद केले जात आहेत. आपण असे राजकारण कधीच केले नाही. विरोधकांनाही विकासात मदतच केली. पण, सध्या संस्थांना टार्गेट केले जात आहे. मात्र, सामान्य लोकांना हे आवडत नसते,' असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला. 

वैद्यनाथ नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अशोक जैन यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी (ता. 19) परळी येथील घरी अटक करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांने मुंडे बहिण-भावांमधील कलगीतुरा पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. 

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी गेवराई तालुक्‍यातील आगर नांदूर, धोंडराई, हिरापूर, शिवणी, ढेकणमोह, वडवणी परिसरात अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 

मुंडे म्हणाल्या की, वैद्यनाथ कारखान्याला अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील समितीने थकहमी दिली. त्याउपरही वैद्यनाथ कारखान्याला कर्जात अडवणूक म्हणजे ऊस उत्पादकांची कोंडी आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकरांसोबत आमचे कौटुंबीक संबंध आहेत. ते जर ऊसतोड मजुरांसाठी भगवान गडाच्या पायथ्याला येत असतील तर आनंदच असल्याचे मुंडे म्हणाल्या. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आजही शेतांमध्ये पाणी आहे. तेवढेच पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतदेखील आहे. शेतकऱ्यांचा दसरा तर चांगला गेला नाही. मात्र, सरकारने भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी सरकारकडे केली. 

मराठवाड्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. सत्तापक्षातील कोणीही आमदार व मंत्र्यांच्या अगोदर नांदेड जिल्ह्यात आपण पीक नुकसानीची पाहणी केल्याचेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले. 

मुंडे म्हणाल्या, विम्यासोबतच भरघोस मदतही मिळाली पाहिजे. नुकसानग्रस्त 99 टक्के भागांत अद्याप पंचनामे झालेले नाहीत. काही ठिकाणी वरवरचे पंचनामे झाले. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

ऊसतोड कामगारांपेक्षा नेते अधिक होऊ नयेत 

दरम्यान, ऊसतोड कामगारांचा संप अजूनही सुरूच आहे. मी अजूनही लवादात आहे. कामगारांच्या बाजूने आहे आणि लवकरात लवकर निर्णय होईल. निर्णय लवादच घेणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ऊसतोड कामगारांपेक्षा नेते अधिक होऊ नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com