सुरेश धसांवर लॉकडाउन काळातील तिसरा गुन्हा दाखल 

लॉकडाउनच्या सुरुवातीला ऊसतोड मजुरांच्या मदतीसाठी परजिल्ह्यात गेल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता ऊसतोड मजुरांना मजुरीत दीडशे टक्के वाढ मिळावी, यासाठी बंदच्या नियोजनाची बैठक घेतल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime against MLA Suresh Dhasa again on the issue of sugarcane workers
Crime against MLA Suresh Dhasa again on the issue of sugarcane workers

बीड : लॉकडाउन काळात सरकारकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य (आमदार) सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरुच आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र जयदत्त धस व इतर 70 लोकांविरुद्ध शुक्रवारी (ता. 4 सप्टेंबर) शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांच्यावर अलिकडच्या काळात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा, तर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी तिसरा गुन्हा आहे. 

ऊसतोड मजुरांना दीडशे टक्के वाढ मिळाली पाहिजे. मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झाल्याशिवाय मजूर पाठवायचे नाहीत, असा पवित्रा घेत आमदार धस यांनी दोन दिवसांपूर्वी मतदार संघात मुकादमांच्या बैठका घेतल्या. शिरुर कासार येथे बैठक घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, लॉकडाउनच्या सुरुवातीला जिल्ह्यातील काही ऊसतोड मजूर पश्‍चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यातील आष्टीसह पाटोदा, गेवराई आदी विविध भागातील मजूर परतत होते. या मजुरांना भिगवण-खेड (ता. कर्जत) येथे पोलिसांनी मारहाण केल्याची कैफीयत त्यांना मध्यरात्री केली होती. त्यानंतर सुरेश धस यांनी घटनास्थळ गाठले आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवरील कारवाईच्या मागणीसाठी मजुरांसोबत ठिय्या मांडला होता. त्यांनी कलम 188 चे उल्लंघन करून बीड जिल्ह्याची हद्द ओलांडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

आष्टी तालुक्‍यातील एका गावात कोरोनाग्रस्त रुग्ण आढल्यानंतर गावात भितीचे वातावरण पसरले होते. त्या वेळी त्यांनी गावात जाऊन लोकांना धीर दिला होता. प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यावेळी कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश केल्यावरुन त्यांच्यावर दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता त्यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर बैठक घेतल्याने पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : भामा आसखेड धरणग्रस्तांवरून मोहिते-गोरे आमने सामने 

चाकण (जि. पुणे) : भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या पाहिजेत, जमिनीला जमीन मिळावी, या मागणीसाठी तसेच पुणे महापालिकेच्या जलवाहिनीचे काम रोखण्यासाठी ता. 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. काही आंदोलनकर्त्यांना अटकही झाली. 

या आंदोलनाच्या प्रश्नावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्यात जुंपली आहे. मोहिते यांनी आंदोलकांची बाजू न घेतल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांच्या कानी हा प्रश्‍न घालणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. मोहिते यांनी "ज्या एजंटांनी, नेत्यांनी मोक्‍याच्या जमिनी लाटल्या, त्याची चौकशी व्हावी,' अशी मागणी केली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोहिते यांच्या मागणीनुसार चौकशीचे आदेश दिले, त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी असे राजकारण खेड तालुक्‍यात रंगले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com